आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्याय तळोदा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव "हर घर तिरंगा" उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

               अध्यापक शिक्षण मंडळद्वरा संचालित,कला व वाणिज्य कॉलेज ट्रस्टचे,आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदा, ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आजादी का अमृत महोत्सव" हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयात  देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा,गितगायान स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, वृक्षारोपण , वेशभूषा स्पर्धा हे कार्यक्रम  घेण्यात आले.


                 तसेच मानवी साखळी करून 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी "हर घर तिरंगा" उपक्रमानिमित्त तळोदा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन जनजागृती केली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.बी.हुंबरे, पर्यवेक्षक प्रा. के. आर. पदमर, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तळोदा शहरातील  हुतात्मा स्मारकाला वंदन करून स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन केले.  कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. एन. शर्मा यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" विषयी माहिती देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.


               प्राचार्य डॉ.एस.एन.शर्मा , कार्यालयीन अधीक्षक श्री.योगेश्वर पंजराळे व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी वृक्षारोपण केले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र देऊन माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आला.


                याप्रसंगी प्रा. सेगा तडवी, प्रा.उषा पावरा, सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा. प्रभावती वसावे, प्रा. सुवर्णा गिरासे,  प्रा..हेमंत चौधरी, प्रा.छोटू ठाकरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री. नितीन मगरे, प्रा. ज्योती मगरे प्रा.सुषमा टवाळे प्रा.संगम यशोद , प्रा.जयेश मगरे ,  प्रा.निषाद माळी, प्रा.किरण चव्हाण,प्रा.अभय वळवी,प्रा.देवा मराठे,प्रा.किरण चव्हाण प्रा. पूजा जैन,प्रा.ऋचा माळी,यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)