शिक्षकांच्या विविध प्रश्नावर मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे यांच्याशी शिक्षकनेते संभाजीराव थोरात यांनी केली चर्चा

शालेयवृत्त सेवा
0

 



महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचा पुढाकार !

                 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांची आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे व राष्ट्रीय शिक्षक संघाचे आदरणीय नेते श्री.संभाजीराव थोरात तात्या यांनी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री.पुरुषोत्तम जाधव यांचे समवेत मुंबई येथे मुख्यमंत्री महोदय यांचे निवासस्थानी "नंदनवन बंगला" येथे भेट घेतली. 


भेटी दरम्यान आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी तात्यासाहेब यांच्याकडून संघटनेची पार्श्वभूमी, संघटनेचा इतिहास तसेच महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व प्रश्न सविस्तरपणे जाणून घेतले.मुख्यमंत्री महोदय यांनी शिक्षक नेते संभाजीराव थोरात तात्यांशी "२० मिनिटे" चर्चा करून पुन्हा नगर विकास विभाग, ग्राम विकास विभाग, शालेय शिक्षण या विभागाचे मंत्री महोदय व सचिव तसेच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे असलेला अर्थ विभाग व सचिव या‌ सर्वांशी चर्चा करून सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्राधान्य देईल असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिले.


आदरणीय तात्यांनी मुख्यमंत्री महोदयांसमोर काही प्रमाणात पुढील प्रश्न मांडले.१) एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.२) शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्या त्वरित करण्यात याव्यात.३) मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी.४) एम एस सी आय टी फाईल निकाली काढून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.५) एक जानेवारी 2004 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची वेतनश्रेणी त्रुटी दूर करण्यात यावी.६) प्राथमिक विभागामध्ये अनेक पदे रिक्त असून त्या पदांची भरती त्वरित करण्यात यावी.७) सर्व प्राथमिक शिक्षकांना इतर विभागाप्रमाणे १०/२०/३/० ची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.८) वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा मूळ नेमणूक म्हणून धरण्यात यावी.


याबरोबरच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली...याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे महासचिव बाळासाहेब झावरे, घाडगे साहेब उपस्थित होते.तसेच जिल्हातील शिक्षक नेते जीवनराव वडजे पाटील ,राज्य उपाध्यक्ष बाबुराव फसमले ,वि.सरचिटणीस संजय अंबुरे वि.नेते पाराजी पोले,जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील भोसले ,जिल्हा कार्यध्यक्ष नरसिंग सोनटक्के अभिनंदन केले आहे.अशी माहिती जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)