जिल्हा परीषद शिक्षंकाच्या प्रलंबीत समस्या 17 सप्टेंबर पर्यंत सोडवाव्यात अन्यथा 19 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन..

शालेयवृत्त सेवा
0

 


 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद(प्रा)ने दिले मा.मुकाअ व शिक्षणाधिकारी यांना निवेदन. !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परीषद नांदेड अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या निवडश्रेणी सह प्रलंबीत असणार्‍या अनेक समस्या बर्‍याच वेळा निवेदन देवुनही निकाली निघत नाहीत.प्रलंबीत असणार्‍या खालील समस्या दि.17 सप्टेंबर "मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत"निकाली काढाव्यात अन्यथा दि.19 सप्टेंबर रोजी जि.प.समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद(प्रा)विभागाने दिला आहे.तशा आशयाचे निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व मा.शिक्षणाधिकारी याना देण्यात आले.


प्रलंबीत समस्या -

1) 24 वर्ष सेवा झालेल्या सर्व निकषपात्र शिक्षकाना निवडश्रेणी लागु करावी.कुठलेही ठोस कारण नसताना मागील 11 वर्षापासुन निवडश्रेणीचा प्रश्न निकाली काढल्या जात नाही.


2) माध्यमीक शिक्षक व इतर विभागाच्या धर्तीवर प्रचंड विलंब टाळण्यासाठी वैदयकीय प्रतीपुर्ती प्रस्ताव मंजुर करण्याचे अधिकार विभागप्रमुख म्हणुन शिक्षणाधिकारी(प्रा)याना देण्यात यावेत.तसेच दाखल असलेले वैदकीय प्रतीपुर्ती प्रस्ताव विनाविलंब निकाली काढावेत.


3) 12वर्ष सेवा पुर्ण झालेल्या सर्व शिक्षक,प्राथमीक पदवीधर,पदो.मुअ,केंद्रप्रमुख याना चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागु करावी.


4) पुर्वीची किनवट/माहुर तालुक्यातील अवघड क्षेत्राची यादी कायम ठेवुन,नवीन शासन निर्देशानुसार 7 पैकी 3 निकषात बसणार्‍या गावांचा अवघड क्षेत्राच्या यादीत समावेश करावा.


5) कार्यरत सर्व विषय शिक्षकाना पदवीधर वेतनश्रेणी लागु करावी.तसेच विषय शिक्षक व पदो.मुख्याध्यापकांच्या रखडलेल्या पदोन्नत्या लवकर कराव्यात.


6) सन 2021-22 च्या GPF च्या स्लीप तात्काळ अचुक पध्दतीने दयाव्यात.


7) पंधराव्या वित्त आयोगातुन सर्व जि.प.शाळाना भौतीक सोयी सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीना आदेशीत करावे.


8) माहुर,बिलोली तालुक्यासह सह शिल्लक राहीलेल्या जिल्हयातील सर्व पात्र शिक्षकाना पं.स.कडुन प्रस्ताव मागवुन सेवेत कायम केल्याची पुरवणी यादी काढावी.


9) जि.प.शाळेत शिकणार्‍या 100% विदयार्थ्याना भेदभाव न करता गणवेश वाटप करावेत.


10) सन 2021-22 व 2022-23 वर्षाचे शाळा अनुदान व गणवेश अनुदान अदयाप पर्यंत अनेक शाळाना भेटले नाही.ते तात्काळ देण्यात यावे.


11) सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता शिक्षकांच्या भनिनि खात्यामधे जमा करावा.व सेवानिवृत शिक्षकांच्या 3 र्‍या हप्त्याची तरतुद पंचायत समीतीला पाठवावी.



वरील मागण्यांचे निवेदन देवुन चर्चा करण्यात आली.शिष्टमंडळामधे शिक्षक नेते विठ्ठल ताकबीडे,विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे,विभागीय उपाध्यक्ष अजित केंद्रे,जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे,कोषाध्यक्ष बालाजी पांपटवार,प्रवक्ते राजेंद्र पाटील,संपर्कप्रमुख व्यकंट गंदपवाड,प्रसिध्दीप्रमुख पदमाकर कुलकर्णी,उपाध्यक्ष संजय मोरे,आर आर जाधव,बळवंत मंगनाळे,विजय गबाळे,धोंडीबा पांडागळे,भगवान बकवाड,शिवकुमार स्वामी,सतिश पा.सांगवीकर,विठ्ठल मुखेडकर,शंकर सुरकुटलावार इ.उपस्थीत होते.शिक्षणाधिकारी डाॅ.सौ.बिरगे मॅडमनी सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यानी दिले.

  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)