गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा, शिक्षकांनी यापूढे केवळ सुलभकांची भूमिका पार पाडावी - प्राचार्य डॉ.रविंद्र अंबेकर

शालेयवृत्त सेवा
0

 


निमगाव केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत संपन्न


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. शिक्षकांनी बदलता शैक्षणिक धोरणांप्रमाणे स्वतःतही अमुलाग्र बदल करावेत. शिक्षकांचे स्वतःचे ज्ञान अपडेट असावे. नविन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी आता केवळ  २० % अध्यापन व ८० % सुलभकांची (Mentor) भूमिका पार पाडावी. मुले स्वयं अध्ययन कसे करतील यासाठी वातावरण निर्मिती करावी.


पालकांच्या मदतीने सुविधा पुरवाव्यात मुलांना किती शिकविले यापेक्षा मुले किती शिकले (अध्ययन निष्पती) हे पार महत्वाचे आहे. आमचे पर्यवेक्षिय यंत्रणेने टाचन काढले का किंवा अभ्यासक्रमाचे किती धडे झाले अशा कालबाह्य बाबींना अजिबातच महत्त्व देवू नये. मुले कसे स्वयंप्रेरणेने शिकतील याला अधिकचे महत्व दयावे. असे आवाहन नांदेड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) नांदेडचे प्राचार्य डॉ.रविंद्र अंबेकर यांनी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाभरा येथील निमगाव केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना केले आहे.

         

शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा.चंद्रकांत धुमाळे, केंद्रप्रमुख  गं.ई.कांबळे, मुख्याध्यापक चंद्रकांत दामेकर,बाबासाहेब सोनाळे, तस्लिम शेख, लक्ष्मण वडजे, विठ्ठल मुखेडकर, राजाराम राठोड, दिलीप नरवाडे, जी.पी.सूर्यवंशी, सतिष व्यंकटपूरवार ओमप्रकाश मस्के, विकास चव्हाण, कोंडीबा कोंपलवाड, संजय सावते, सूर्यकांत हुलकाने, अँड.सचिन मगर, बालाजी गुंजकर यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

                  

याप्रसंगी ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा.चंद्रकांत धुमाळे यांनी निपून भारत अभियानात शिक्षकांची व पालकांची भूमिका विशेषतः माता पालक संघाची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. आता शिक्षकांनी पारंपारिक पध्दतीने केवळ शिकविण्यावर भर देवू नये. शिक्षकांनी स्वतः शिकविण्याचा भार एकदम कमी करावा आता शिक्षकांनी केवळ शैक्षणिक सुविधापूरवून मार्गदर्शक (Facilator) च्या भूमिकेत येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना शिक्षण विस्तार अधिकारी मा.सुनील पाटील यांनी आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना अगदी  गुणवत्तापूर्ण शिकवितात परंतु    शासनाच्या धोरण प्रभावीपणे राबवितांना याचे अद्यावत  रेकॉर्ड ठेवण्याचे आवाहन केले.  निमगाव केंद्रात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

     

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  केंद्रप्रमुख गं.ई. कांबळे यांनी केले तर स्वागतपर मनोगत मुख्याध्यापक चंद्रकांत दामेकर यांनी व्यक्त केले. यापसंगी निपून भारतची सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सुनील ढोबे,ओमप्रकाश मस्के, राजाराम राठोड व कोंडीबा कोंपलवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेसाठी मार्गदर्शक साधनव्यक्ती म्हणून चंद्रकांत अटकळीकर, नागेश क्यातमवार, बाळासाहेब पवार, श्रीकांत मांडवकर, सचिन खरात यांनी यशस्वी भूमिका पार पाडली.  शिक्षण परिषदेचे सुत्रसंचालन व आभार बालासाहेब लोणे यांनी पार पाडले.

       

सदरील शिक्षण परिषद  यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाभरा केंद्र निमगाव शाळेतील बळीराम कदम, अशोक फुलवळकर, पांडुरंग चव्हाण, विनायक मुलंगे, राजेश चिटकुलवार, सुनील कंठाळे, सौ.प्रतिभा बसापूरे, सौ.विजया पिन्नलवार, सौ.रंजिता भिसे, विठठलअप्पा बिच्चेवार यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षण परिषद अतिशय ज्ञानपूर्ण, प्रसन्न, विनोदी व आनंदी वातावरणात पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)