ऑनलाइन प्रशिक्षण केलेल्या शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी देण्यात यावी - शिक्षक संघटना | Selection Pay Range

शालेयवृत्त सेवा
0

 



महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद / महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना / इंडियन बहुजन टिचर्स असोशिएशन / शिक्षक सेना / शिक्षक भारती / प्रहार शिक्षक संघटना.. आग्रही !


पुणे ( शालेय वृत्तसेवा ) : 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना सरसकट वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रदान करण्यात यावी.



१ जून ते ३१ जुलै २०२२ दरम्यान १२ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीसाठी प्रशिक्षण होते तर २४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण होते. प्रशिक्षणार्थीने २००० रुपये शुल्क भरून नोंदणी केली होती आणि दिलेल्या वेळेत प्रशिक्षण पूर्ण केले. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना सरसकट वेतनश्रेणी प्रदान करण्यात यावी अशी विविध शिक्षक संघटनेची रास्त मागणी आहे.



" राज्यातील ज्या ज्या शिक्षक बंधू-भगिनींनी वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे आणि जे शिक्षक बंधू भगिनी वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र आहेत त्या सर्व पात्र शिक्षक बंधू भगिनींना वरिष्ठ,निवड श्रेणी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आहे.
- मधुकर उन्हाळे
राज्य कार्याध्यक्ष : 
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद



"प्रशिक्षणप्राप्त शिक्षकांचे वरीष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ निकाली काढण्याबाबत महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय, मुंबई जवाहर बालभवन, तळमजला नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई ४०० ००४ / ८६ दिनांक २८ जुलै २०२२ जा.क्र. शिउसं माध्य/ २०२२/७५१४ संदर्भाने पत्र काढले आहे.वरिष्ठ / निवड श्रेणी online प्रशिक्षण केलेल्या सर्व शिक्षकांना शासनाने ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण पुर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले त्या सर्वांना विनाविलंब वेतन श्रेणी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला लेखी कळविले आहे. शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद नांदेड यांनी तात्काळ आदेश निर्गमित करण्यासाठी उचित कार्यवाही करावी.

- जी.एस.मंगनाळे

राज्य उपाध्यक्ष : 

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना



" वरिष्ठ श्रेणी १२ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळत असते पण २४ वर्षे सेवा झालेल्यांना सर्वांना निवड श्रेणी मिळत नाही. आमची असी मागणी आहे की २४ वर्षे सेवा झालेल्या सर्वच शिक्षकांना निवड श्रेणी मिळावी.

- बालासाहेब लोणे

केंदीय जिल्हाध्यक्ष : ' इब्टा ' नांदेड

इंडियन बहुजन टिचर्स असोशिएशन




" प्रशिक्षण झालेल्या सर्व शिक्षक बांधवाना निवडश्रेणी मिळावी ही योग्य मागणी आहे. एखाद्या बांधवानी 12 वर्ष सेवा केल्यानंतर चट्टोपाध्याय वेतनश्रेणी दिली जाते. तसेच जो बांधव पदवीधर , पदोन्नत मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख संवर्गातुन 12 वर्ष सेवा झाली तर ती वेगळी वेतनश्रेणी दिली जाते. तर मग एखाद्या शिक्षक बांधव जर सतत 24 वर्षे त्याच शिक्षक संवर्गात सेवा केली असेल तर सरसकट सर्व बांधवाना नक्कीच निवडश्रेणी मिळाली पाहिजे. ही न्याय बाजु आहे. या विषयास माझा व माझ्या संघटनेकडून जाहीर पाठिंबा आहे.                 

 - संतोष अंबुलगेकर , 

जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना / नांदेड



" वरिष्ठ निवड श्रेणीचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे तसेच ज्या शिक्षकांना बारा वर्षे पूर्ण झालेले आहे किंवा 24 वर्षे पूर्ण झालेली आहे अशा सर्व पात्र शिक्षकांना सर्वप्रथम वेतनश्रेणी लागू करावी व त्यानंतर प्रशिक्षणासाठी त्यांना एक ते दोन वर्षाचा अवधी देण्यात यावा असे आमचे मत आहे त्यामुळे कोणताही शिक्षक या वेतनश्रेणी पासून वंचित राहणार नाही आणि शिक्षकांमध्ये एक आनंदाचे वातावरण राहील. जसे की आपण पदवीधर पदी नियुक्ती देताना पाच वर्षापर्यंत B.A.,B.S.C. अथवा बी.एड. करण्याच्या अटीवर नियुक्त्या देत असतो त्याप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी देताना देखील दोन वर्षापर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीवर वेतनश्रेणी लागू करावी असे मला वाटते.

- चंद्रकांत कुनके

जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती / नांदेड



"खरच वरिष्ठ वेतनश्रेणी चा प्रश्न शिक्षकांच्या दृष्टीने फारच जिव्हाळ्याचा आहे,अनेक वर्षापासून हा विषय जाणीव पुर्वक प्रशासना कडून टाळाटाळ केली जात आहे,आम्ही राज्य व जिल्हा,स्तरावरुन सतत पाठपुरावा करत आहोत,पण झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने आता तरी online प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षक बंधू/भगिनीना वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून न्याय द्यावा अशी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष या नात्याने आग्रहाची मागणी आहे.

- मल्लिकार्जुन जोडराणे

जिल्हाध्यक्ष

प्रहार शिक्षक संघटना नांदेड 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)