नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :
जि.प.शाळा चोपलाईपाडा, अंगणवाडी केंद्र आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा जनजागृती निमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरी काढण्यापूर्वी शालेय आवारात सभा भरवण्यात आली.
सभेत उपस्थित ग्रामस्थांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमाची माहिती, महत्व, राष्ट्रध्वज आणि ध्वजारोहणचे महत्व सांगण्यात आले. दि.१३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रध्वज कुठे व कोणामार्फत उपलब्ध केला जाणार, ध्वजारोहण कसे करावे,त्याची काळजी व सुरक्षा विषयक सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमात धनसिंग वसावे सरपंच,वालंबा, ईश्वर वसावे ग्रा.पं.सदस्य श्रीम.कुवीताई वसावे पोलिस पाटील, फुलसिंग वसावे, खोजल्या वसावे शा.व्य.स.अध्यक्ष रतनसिंग वळवी मुख्याध्यापक, गणेश पावरा , श्रीम.दिवलीताई वसावे अंगणवाडी सेविका, श्रीम.शेवंतीबाई ,श्रीम.सेवाबाई,वंतीबाई आशा वर्कर, राज्या महाराज व गावातील तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .