राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरावेत.. पुरोगामीची मागणी

शालेयवृत्त सेवा
0

  





पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना निवेदन


नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

राज्यात प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी ही शिक्षण विभागातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्याचा शैक्षणिक कामकाजावर मोठा परिणाम होत आहे करिता ही पदे तात्काळ भरावीत तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे व पदोन्नती प्रक्रिया पार पाडावी या विषयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्ह्यात मा.मुख्यमंत्री व मा.शिक्षणमंत्री यांना  खुशालसिंह  परदेशी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फतीने पाठवण्यात आले आहे.

   

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांची १७५४३पदे रिक्त आहेत यामुळे विद्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा  २००९अन्वये विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मंजूर असलेली सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. तसे शिक्षकांना शैक्षणिक कार्य सोडून अन्य अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणावर दिली जात आहे त्यामुळे त्यांचे शिकवण्याचे मुख्य काम मागे पडत आहे. 


तसेच राज्यातील प्राथमिक शाळेत शिपाई व क्लार्क नसल्यामुळे शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करुन शिक्षकांना बिएलओ सह सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करावे यासह राज्यातील आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत ऑन लाईन बदल्यांचे मॅपिंग झाल्याने बदली आदेश येईपर्यंत सर्वप्रकारच्या पदोन्नती करण्यात येऊ नयेत असे निर्देश आहेत. तरी जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेस विलंब लागणार असेल तर आठ दिवसात सर्व प्रकारच्या पदोन्नती प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनास द्यावेत. 


विद्यार्थी हितासाठी वरील मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन लवकरात लवकर त्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, हरिश ससनकर राज्य सरचिटणीस, विजय भोगेकर राज्य नेते, अल्काताई ठाकरे महिला राज्याध्यक्ष , बालाजी पांडागळे राज्य कोषाध्यक्ष,जी.एस.मंगनाळे राज्य उपाध्यक्ष, अशोक मोरे राज्य संघटक,औरंगाबाद विभागिय अध्यक्ष सतीश रेड्डी,  शिवशंकर सोमवंशी लातुर विभागीय अध्यक्ष, विभागीय उपाध्यक्ष श्रीराम कलणे,जे.डी.पाटील कदम जिल्हा अध्यक्ष, नागनाथ गाभणे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, जिल्हा मुख्य संघटक जी.बी.मोरे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कोंडावार ,  मुंडलोड सर, मनोहर शितळे , व्ही बी.बोनतापल्ले  यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)