नंदुरबार (प्रतिनिधी गोपाल गावीत) :
शहादा तालुक्यातील जि प.उर्दू शाळा प्रकाशा व खाजगी प्राथमिक मराठी शाळा प्रकाशा यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण भारत अभियान व शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या आदेशान्वये राज्यातील सर्व केंद्रांमध्ये निपुण भारत अंतर्गत एकदिवसीय शिक्षक उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उद्बोधन सत्रात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सदर प्रशिक्षण प्रास्ताविक निपुण भारत अभियान बाबत प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी केले. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता तथा निपुण भारत जिल्हा नोडल अधिकारी रमेश चौधरी यांनी निपुण भारत अभियान, पार्श्वभूमी गरज महत्व, शासन स्तरावरावरील प्रयत्न, स्वरुप, ध्येये अध्ययन निष्पत्ती, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियान, शिक्षक भूमिका, अध्ययन अध्यापन साहित्याचा वापर, ई-साहित्य वापर, विद्यार्थ्यांना अपेक्षित सर्व गुणसंपन्न गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक दिवाळी साजरी करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करुन मार्गदर्शन केले.
तसेच डायटचे अधिव्याख्याता सुभाष वसावे यांनी दिक्षा, विविध भागधारकांची भूमिका पालक व समाज सहभाग, मुल्यमापन विषयी उपस्थित शिक्षक बांधवांना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणास सुलभक म्हणून तज्ञ शिक्षक म्हणून रामलाल पारधी,राजू मोरे, गोकुळ लोहार, प्रशांत बागुल यांनी कार्य केले. सदर प्रशिक्षणास केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षक व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
सदर सत्राच्या शेवटी सामूहिक निपूण प्रतिज्ञा घेण्यात आली .सदर सत्राचे सूत्रसंचालन जावेद मन्सुरी यांनी केले,निपुण भारत शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी केंद्रातील शिक्षक दर्पण भामरे, महेंद्र शिंपी, किशोर महाले , विश्वास माळी,उमेश विसपुते , कैलास गव्हाणे, तुषार चौधरी, कीर्ती जोशी मॅडम, निकुंभे सर,आदींनी परिश्रम घेतले. उपस्थित शिक्षक बंधू भगिनी यांचे आभार शिक्षिका शबीना बानो जलोलोद्दीन यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .