प्रहार शिक्षक संघटनेतर्फे आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना पेढे वाटून आनंदोत्सव !

शालेयवृत्त सेवा
0

 




नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

याहा मोगी माता सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनुस पठाण, गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी यांनी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. 


नंदुरबार येथून स्वगृही जिल्हृयात १३० शिक्षक जाणार आहेत. जिल्हा परिषद नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांच्या हस्ते शिक्षकांना पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धरमदास गावीत, शहादा तालुका अध्यक्ष तुकाराम अलट, सचिव मन्मथ बरडे, पदाधिकारी उपस्थित होते. 


शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बारा तेरा वर्षापासून अनेक शिक्षक बंधू भगिनी यांनी वाडी-वस्ती, पाड्यावरील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते. बदलीच्या  शिक्षकांच्या उद्यापासून आंतरजिल्हा बदल्या राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन राबविली जात आहे. त्यासाठी तयार केलेले पोर्टल पूर्ण तयार झाले असून बदल्यांची प्रक्रिया आता उद्या बदली आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. 


शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी बदली आदेश प्राप्त होतील. ३१ तासात ३९४३ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अखेर ३१ तासानंतर पूर्ण झाली असून एकूण ३९४३ शिक्षकांची बदली या प्रक्रियेत झाली आहे. ओटीटी सॉफ्टवेअर द्वारे शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत ४८ संगणक असलेली ही यंत्रणा १४ फेऱ्यांमध्ये ३१ तास चालली. ४८ तज्ञ या प्रक्रियेत सहभागी होते. दि.१९ रोजी रात्री १२ वा.बदली प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली.


आज दि.२१ रोजी सकाळी ७ वा.आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली .राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या उपलब्ध रिक्त पदांवर तसेच ज्या ठिकाणी रिक्त पद उपलब्ध नाही अश्या व आहेत अश्या दोन्ही जिल्ह्यात साखळी पद्धतीने देखील बदल्या या प्रक्रियेत करण्यात आल्या आहेत.बदलीचा संपूर्ण डाटा ENCRYPT ( एका विशिष्ट गोपनीय कोड मध्ये रुपांतरीत ) करण्यात आला आहे. उद्या दि.२२ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीष महाजन यांचे हस्ते प्रकाशित केले जाणार आहे. तदनंतर बदली झालेल्या शिक्षकांना पोर्टलवर बदली आदेश उपलब्ध केले जाणार आहे. याबाबत मेलद्वारे संबंधित शिक्षकाला माहिती उपलब्ध होणार आहे. 


आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पुर्ण झाली असून जिल्हा नुसार संबंधित जिल्ह्यातून बाहेर पडणारे शिक्षकांची संख्या जाहीर करण्यात आली आहे.या प्रक्रियेत एन ओसी -१ , कॅडर १ - ५७५ , कॅडर २- ५३८ व सर्वसाधारण - २८२९ शिक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्त प्रक्रिया लवकरच होणार असून या संबंधीचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात येणार आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने यापूर्वी देण्यात आलेल्या माहिती नुसार बदली प्रक्रिया मुदतीत पूर्ण झाली असून सोमवारी आदेश निर्गमित होणार आहे.


 यापूर्वी चार टप्प्यात १०८०० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या होत्या .या प्रक्रियेत ३९४३ बदल्या पूर्ण झाल्या असून एकूण १५ हजार जवळ आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन प्रक्रियेने आज रोजी पर्यंत पूर्ण झाल्या आहेत. राज्यात एकूण २३ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रतीक्षेत होते ,पैकी १५ हजार पूर्ण झाल्या असून उर्वरित ८ हजार शिक्षक अजूनही बदली प्रतीक्षेत आहेत हे उल्लेखनीय.आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षक बांधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)