अनाथ मुलांना आणि जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे..

शालेयवृत्त सेवा
0

 


     

 पातळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम ।


नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

सिन्नर तालुक्यातील पाडळी पातळेश्वर माध्यमिक विद्यालयात गत पंचवीस वर्षापासून कै. सुमंतकाका गुजराथी यांच्या प्रेरणेतून विद्यालयातील विद्यार्थीनी स्व. प्रेरणेने राख्या जमा करून सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांसाठी राख्या पाठवतात आत्तापर्यंत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एक लाख राख्या पाठविलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी पाडळी, आशापुर ,ठाणगाव ,हिवरे, पिंपळे, टोळेवस्ती ,बोगीरवाडी, पलाट व ठाकरवाडी परिसरातील सीमेवर लढणारे जवान यांना बोलावून रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी कृष्णा गणपत रेवगडे, विशाल राजाराम रेवगडे या जवानांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. 


          समर्थ सावली बालसंगोपन अनाथ आश्रम ठाणगाव येथे शिकणाऱ्या मुलांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले ज्यांना कोणी नाही त्यांना देई आधार या उक्तीप्रमाणे श्री जयराम शिंदे यांनी आपल्या दातृत्वातून पालकत्व स्वीकारलेल्या मुलांना आधार देऊन  समाजसेवेचा वसा जोपसला यासाठी हातभार म्हणून विद्यालयाने या विद्यार्थ्यांना बिस्किट पुडा देऊन रक्षाबंधन साजरे करून अनाथ मुलांची माय माऊली म्हणून त्यांचा गौरव केला .


यात यश पगार, रुद्र भडके, समर्थ शेवाळे, मयूर पाटील, हर्षल नरड, हर्षद जाणेराव, कन्हैया गांगुर्डे ,ओमकार तळेकर, कृष्णा पगार या अनाथ मुलांच्या बहिणी म्हणून आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी स्वतः होऊन राख्या बांधल्या श्री जयराम शिंदे यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींनी आमच्या अनाथाश्रमात येऊन या मुलांचे भगिनीत्व पत्करले हे आमचे खरोखर भाग्य होय असे म्हटले.



          जे जवान भारतीय सीमेवर   अहोरात्र आपल्यासाठी झटतात व देशाचे रक्षण करतात त्यांच्या प्रति प्रेम भावना व्यक्त करून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस बी देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी शालेय समिती चेअरमन श्री चंद्रभान रेवगडे यांनी जवान आपल्या देशाचे रक्षण करतात आपण सर्वांनी महिलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेलू या असे आवाहन केले या जवानांनी आम्ही देश रक्षणासाठी व आमच्या बांधवांच्यारक्षणासाठी सदैव तत्पर राहू असा संदेश दिला व आम्ही सीमेवर देशाचे रक्षण करत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळते ते या आमच्या भगिनींचे  व आम्हाला शिकवणाऱ्या गुरुजनांचे.


       आतापर्यंत विद्यालयातील व परिसरातील दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी देश रक्षणासाठी सीमेवर लढतात ही विद्यालयाची भूषणाची बाब आहे या जवानांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या .

          याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री बी आर चव्हाण, श्री आर व्ही निकम ,श्री एस एम कोटकर, श्री आर टी गिरी, श्री एम सी शिंगोटे, श्रीमती शेख एम एम ,सविता देशमुख, श्री टि के रेवगडे, श्रीमती सी बी शिंदे, श्री के डी गांगुर्डे ,एस डी पाटोळे ,आर एस ढोली, ए बी थोरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)