जुनी पेन्शनसाठी शिक्षक संघटना समन्वय समिती औरंगाबादच्या विराट मोर्चाला हजारोंच्या संख्येने शिक्षक बंधू भगिनींनी सामील व्हावे; शेख अब्दुल रहीम

शालेयवृत्त सेवा
0

 



८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार विराट मोर्चा!


औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ):

रस्त्यावर उतरून लढणारा शिक्षक वर्ग फक्त हजारांमध्ये! घरात बसून पेन्शन कुठपर्यंत आली, पेन्शन कधी मिळेल असे प्रश्न विचारणारे लाखोंमध्ये! चला तर आपल्याला संधी आलेली आहे, शिक्षक संघटना समन्वय समिती औरंगाबादच्या शिक्षकांच्या भव्य विराट मोर्चात सहभागी होऊन आपली ताकद दाखवण्याची.  प्रत्यक्षात आपण सहभाग घेऊन सरकारला जुनी पेन्शन योजना देण्यास भाग पाडू .तसेच जुनी पेन्शन या मागणीसह  राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी हा मोर्चा निघणार आहे. 


शिक्षक संघटना समन्वय समिती औरंगाबादचा विराट मोर्चा औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर 8 ऑगस्ट 2022 सोमवारी रोजी दुपारी 2 वाजेपासून क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद पर्यंत निघणार आहेत. त्याकरिता जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींनी सहभाग घेऊन आपली मागणी मान्य करून घेऊया. असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)