नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :
एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित,एस. ए. मिशन इंग्रजी प्रायमरी स्कुल येथे वृक्षारोपण कार्यक्रम व ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. युनूस पठाण उपशिक्षणधिकारी (प्राथमिक विभाग,जिल्हा परिषद, नंदुरबार) हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्राचे संपादक रमाकांत पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री मुकेश पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, भावेश सोनवणे,प्रशासन अधिकारी, नगरपालिका नंदुरबार, एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक संदेश यंगड यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांबद्दल व ग्रंथाबद्दल माहिती दिली व पर्यावरणामध्ये वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले, यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालय दालनाचे उद्घाटन, व वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण साहेबांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनामध्ये पर्यावरणाचे महत्व व जीवनात पुस्तकांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .