नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मारतळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील जिल्हा परिषदेच्या सर्व 186 मुलांनी आपाआपल्या प्रत्येकाच्या घरी तिरंगा लावण्याचा संकल्प केला असून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व मुलांनी सक्रिय सहभाग घेण्याचा निश्चय केला आहे.
यावेळी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले असून स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवायचा व तिरंग्याची घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मुलांना मार्गदर्शन केले यावेळी गावातील श्रीमती रेणुका कोंडेवार यांच्या भारत माता बचत गटाच्या माध्यमातून सर्व मुलांना झेंडा उपलब्ध झालाआहे.
सर्व मुलांनी झेंडा विकत घेतला असून प्रत्येकाच्या घरी आपल्या आईच्या हस्ते झेंडा लावण्याचा संकल्प सुद्धा केला आहे. सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे विशेष प्रयत्न करत आहेत यावेळी मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे, देवबा होळकर ,उज्वला जोशी बालाजी प्यार लावार माधुरी मलदोडे रमेश हनुमंते बचत गटाच्या रेणुका कोंडेवार व विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .