राज्य शिक्षक पुरस्काराचे वितरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी ३ जानेवारीला करण्यात यावे | Maharashtra State Teachers Award

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्य शिक्षक पुरस्काराचे वितरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी  (३ जानेवारी ला) करण्यात यावी. अशा अशायाचे निवेदन मा. मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना मेल व्दारे पाठवण्यात आले आहे.


पुरोगामी महाराष्ट्रातील आपल्या सरकारने "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार " असे नामाभिधान करून सावित्रीमाईच्या कार्याचा  गौरवच केला आहात. त्याबद्दल सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन ! त्या अनुषंगाने त्या नावाला शोभेल असा पुरस्कार वितरण सोहळा त्यांच्या जन्मदिनी म्हणजे ३ जानेवारीला दरवर्षी प्रदान करण्यात यावा असे आमचे प्रामाणिक मत आहे. 


शिक्षण हा समाजाचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित व निष्ठापूर्वक काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. 


थोर समाजसुधारक सावित्रीमाईंनी ज्ञानाची ज्योत लावून खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात केली. पहिली महिला शिक्षिकेच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना आमचा ऊर भरून येणार यात शंका नाही. म्हणून पुरोगामी महाराष्ट्रातील आपल्या सरकारने हाच पुरस्कार सोहळा ३ जानेवारीला आयोजित करून खऱ्या अर्थाने सावित्रीमाईचे विचार सर्वापर्यंत पोहोचवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. असे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी मेलव्दारे निवेदन दिले आहे.


 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)