जारीकोट येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. विस्ताराधिकारी यांच्याकडून रोख 1100/ रुपये व गोल्डन पेन देऊन विद्यार्थिनी कु. वर्षा वाघमारे सत्कार करण्यात आला.



माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कुल अनुदानित जारीकोट येथील मराठी विषयात सर्वात जास्त गुण घेणारी विद्यार्थिनी कु. वर्षा वाघमारे हिला जारीकोट नगरीचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. पद्मावती रामोड व सौ. यडपलवार मॅडम तसेच गजानन रामोड यांच्या हस्ते या विद्यार्थिनीला शिक्षण विस्ताराधिकारी यांच्याकडून रोख 1100/ रुपये व गोल्डन पेन देऊन सत्कार करण्यात आले. 


याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. इलतेपोड येवतीकर,  केंद्रीय मुख्याध्यापक एस. एन. माळगे व शाळेतील ज्येष्ठ शिक्षक लोलम, सिद्धेवाड, उशलवार, व यलमाटे मॅडम उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)