हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

शालेयवृत्त सेवा
0



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

हिरा प्रतिष्ठान संचलित श्री.सहकारमहर्षी श्री.अण्णासाहेब पि.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, सौ. ताईसाहेब इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्त संस्थेचे अध्यक्ष व श्री. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या शुभहस्ते शालेय प्रांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न करण्यात आले.


यासमारंभ प्रसंगी संस्थेचे संचालक श्री.बळवंत जाधव, डॉ.सुधीर भोलाणे,संस्थेच्या संचालिका सौ.अनिता चौधरी,हिरा फाउंडेशन च्या संचालिका सौ.प्रणिता चौधरी, युवा नेतृत्व प्रथमेश चौधरी,नगरसेवक श्री प्रशांत चौधरी,श्री.निलेश पाडवी,श्री.कमल ठाकूर,भाजपा पदाधिकारी श्री.प्रकाश चौधरी, प्रा.महेंद्र बोरसे, श्री.राजेंद्र शर्मा, सामाजिक कार्यकर्ते श्री.अजिज खाटीक, श्री.राजेंद्र गोरख चौधरी,श्री.राजेंद्र एकनाथ चौधरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुरेंद्र पाटील, श्री.किरण त्रिवेदी, प्रा. चंद्रकांत वाणी तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवा निमित्त हिरा प्रतिष्ठान अधिनिस्त सर्व विद्यालयांच्या वतीने देशभक्तीपर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात थोर महापुरुषांची वेशभूषा, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, बासरीवादन,सर्वधर्म समभाव वेशभूषा,आदिवासी नृत्य,नाटिका अशा विविध कलागुणांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा व एकतेचा संदेश देत अमृतमहोत्सवाचा आनंद साजरा केला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत संस्थेचे संचालक श्री. बळवंत जाधव यांचा वाढदिवसानिमित्ताने मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.


 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी श्री. सुरेंद्र पाटील यांची नवनियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. राज्य गाईड पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कु.वैष्णवी अभय सोनार, कु.भूमिका कैलास पानपाटील, कु.पौर्णिमा विजय पवार, कु.युक्ती अर्जुन वायकर या विद्यार्थिनींचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्काऊट गाईड शिक्षिका श्रीमती. छाया मोरे यांचा व पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी वादन शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल इयत्ता 11 वी चा विद्यार्थी रोहन संतोष चौधरी याचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता 8 वी एनएमएमएस परीक्षेत 15 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल व 8 वी पास 30 विद्यार्थिनींना शासनाकडून मोफत सायकल प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 


अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जि.नाशिक,बाल संस्कार व युवा प्रबोधन विभाग आयोजित संकल्प एक कोटी वृक्ष लागवड या महा वृक्षारोपण अभियान लागवड व संवर्धन उपक्रमा अंतर्गत श्री स्वामी समर्थ केंद्र, नंदुरबार व हिरा प्रतिष्ठान यांच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका सौ.अनिता चौधरी व हिरा फाउंडेशनच्या संचालिका सौ.प्रणिता चौधरी यांच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आले. तसेच नांदर्खे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.कृष्णा जवाहरलाल राठोड यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश चव्हाण,ध्वजारोहणाचे सुत्रसंचालन श्रीमती.चेतना चौधरी,सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री.अनिल चौधरी,सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सतीष काटके व आभार प्रदर्शन श्रीमती.सोनल मोरे यांनी केले तर समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक - प्राध्यापिका, शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)