20% व 40% टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमांनुसार 100% टक्के अनुदान द्या - शेख अब्दुल रहीम

शालेयवृत्त सेवा
0

 



महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.ना.अंबादास दानवे दादा यांना निवेदन सादर!


औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

औरंगाबाद विमानतळावर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सरांनी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.अंबादास दानवे दादा यांची भेट घेतली व त्यांचा सर्वप्रथम विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे परंपरेनुसार पुष्पगुच्छ न देता पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला व त्यांनतर विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.


त्यामध्ये

१) २० % व ४० % अनुदानित शाळांना प्रचलीत नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे.


२) त्रुटीपात्र शाळांना अनुदान घोषित करण्यात यावे. 


३) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी . 


४) सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट प्रोत्साहन भत्ता तसेच गणवेश देण्यात यावे.

 

५) शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे निकाल लवकरात लवकर घोषित करण्यात यावे.


६) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना त्वरित लागू करावी. 


७) DCPS/NPS खाते नसलेल्या शिक्षक-शिक्षक्तेत्तर कर्मचा-यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने  त्वरित देण्यात यावे.


विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे व चालू पावसाळी अधिवेशनात सर्व प्रश्नांवर आवाज उठवून मार्गी लावण्याचे प्रयत्न करावेत. आदरणीय दादांनी सर्व प्रश्न समजून लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)