गणेश उत्सवापूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार होणार - शिक्षक आमदार कपिल पाटील

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक भारतीची मागणी मंजूर !


मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) -

गणपतीपूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत वित्त विभागाने आज शासन निर्णय जारी केला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.


राज्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरोघरी गणपतीची आरास केली जाते. श्री गणेशाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार २९ ऑगस्ट पूर्वी होणे आवश्यक आहे. गणेश उत्सवापूर्वी पगार होण्यासाठी ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन देयके जमा करून पुरेसा निधी वितरीत करणे आवश्यक आहे. 


यासंदर्भात आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने वित्त आणि शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार आज अखेर याबाबत शासन निर्णय निघाला आहे. यामुळे शिक्षक, कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही सुभाष मोरे यांनी सांगितले आहे.


गणेश उत्सव साजरा करण्यासाठी वित्त विभागाने केलेल्या सहकार्याबद्दल हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षक जितेंद्र महाजन यांनी स्वागत केले आहे. प्रकाश पंचाल सरांनी शिक्षकांचा लवकर पगार होण्यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)