गणेशोत्सवाच्या काळात पाच दिवसांची सुट्टी.. शिक्षण विभागाचे परिपत्रक ! | Ganesh Ustav

शालेयवृत्त सेवा
0


सुट्टीच्या कालावधीत कोणतीही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात येऊ नये !


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

गणेशोत्सव कालावधीत कोणतीही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नये तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ५ दिवसांची सुट्टी जाहिर करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे. 


बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनिमय २००९ व शासनाचे प्रचलित आदेश, नियम, मार्गदर्शक सूचना यानुसार आवश्यक किमान शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल या अटींच्या अधीन राहून शाळांच्या सुट्टयांचे नियोजन व त्यामध्ये बदल करण्याच्या निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये मान्य केला जावा असे आदेशित केलेले आहे. 


त्यानुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती / पालक शिक्षक संघ यांच्या सहमतीनुसार व शिफारशीनुसार गणेशोत्वासाची सुट्टी जाहिर करण्यात यावी. एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. मात्र सुट्टीच्या कालावधीत कोणतीही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात येऊ नये. उपरोक्त विषयाबाबत पालकांच्या तक्रारी होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.अशा आशयाचे परीपत्रक बृहन्मुंबई पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे यांनी काढले आहे.


चेतन रमेश पेडणेकर, प्रमुख संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. शिक्षक आमदार, कपिल पाटील, सदस्य विधान परिषद, मुंबई यांनी या संदर्भात शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला होता. 


गणेशोत्सव काळातील सुट्टी व परीक्षा नसल्याने आम्ही मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करू असे ध्वनिल द्विवेदी यांनी सांगितले. तर कोरोनाच्या नंतर दोन वर्षांनी आम्ही गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करु असा आशावाद श्रीमती निधी जैन यांनी व्यक्त केला आहे. आरती सिंग यांनी आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच तात्काळ शिक्षण विभागाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांनीच शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)