स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन व्यक्त केली कृतज्ञता !

शालेयवृत्त सेवा
0

 



श्री .स.भु. प्रशालेचे स्वातंत्र्याच्या अमृत   महोत्सवानिमित्त अनोखे अभिवादन !


जालना ( शालेय वृत्तसेवा ) :

संपूर्ण भारत देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी साजरा होत आहे .देशाच्या स्वातंत्र्याला अमृत महोत्सवापर्यंत पोहोचवण्याचं खरं श्रेय देशभक्तांना, स्वातंत्र्य सैनिकांना जाते.. याची जाणीव ठेवून संपूर्ण देशवासीयांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या  प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ,त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले पाहिजे .त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे  हा हेतू समोर ठेवून कुंभार पिंपळगाव येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांच्यासह प्रातिनिधिक स्वरूपात  महेश बहाळकर ,सुधाकर येवतीकर या शिक्षकांनी कुंभार पिंपळगाव मधील स्वातंत्र्य सैनिक कै. श्रीकृष्णजी राठी यांचे सुपुत्र जयप्रकाश राठी आणि नातू किशोर राठी , किरण राठी, पवन राठी यांच्या सह संपूर्ण कुटुंबाची भेट घेऊनस्वातंत्र्य सैनिक श्रीकृष्णजी राठी यांच्या कार्याला वंदन केले .


स्वातंत्र्य सैनिक श्रीकृष्ण राठी यांचे सुपुत्र श्री जयप्रकाश जी राठी यांनी आपल्या वडिलांच्या कार्याला संतोष सवडे यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान उजाळा दिला स्वातंञ्य सैनिकश्रीकृष्ण राठी यांनी केलेल्या कार्याचे फळ म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे 1986 मध्ये सन्मानपत्र देऊन तसेच केंद्र शासनातर्फे ताम्रपट देऊन गौरव करण्यात आल्याचे जयप्रकाश राठी यांनी सांगितले.


स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही स्वातंत्र्यसैनिक कै . श्रीकृष्ण राठी यांनी आपले शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरूच ठेवले होते; असे सांगून वर्तमान काळामध्ये तरुणांमध्ये देशभक्ती रुजविण्याची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्याचे काम स .भु .प्रशाले सारख्या शाळा करताना दिसतायेत याचा मनोमन आनंद होतो आहे, अशा प्रकारच्या भावना व्यक्त करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राठी कुटुंबीयांतर्फे शुभेच्छा दिल्या व स .भु.प्रशालेचे आभार मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)