हर घर तिरंगा : शिक्षणाधिकारी सविता बिरगे मॅडम यांनी शाळा बाहय मुलांशी संवाद साधत शेतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी दिली भेट ! | EO Savita Birage

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ):

मारतळा दिनांक 13 ऑगस्ट 2022 नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष शिक्षण अधिकारी डॉक्टर सविता बिर्गे मॅडम यांनी हरघर तिरंगा या मोहिमेअंतर्गत कापशी परिसरातील  विविध शाळांना दिल्या भेटी प्रामुख्याने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मारतळा येथे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी काही दिवसापूर्वी शाळाबाह्य मुलांना दाखल केले होते त्या मुलांच्या थेट घरी म्हणजे मारतळा कापसी रोड लागत मुस्तफा  शेख यांच्या शेतातील घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्या मुलांशी व पालकांशी मुक्तपणे संवाद साधला. 


आजारी असल्याने गेल्या काही दिवसापासून तो शाळेत आला नव्हता हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत त्या मुलांना हर घर तिरंगा या उपक्रमाबद्दल माहिती दिली व प्रत्यक्ष त्याला एक झेंडा आपल्या वतीने दिला व तो त्याच्या आईच्या हाताने त्याच्या झोपडीवर झेंडा लावला शेतात राहणाऱ्या गरीब कुटुंबाच्या घरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देणे ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे व त्या पालकांना व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी प्रेरणादायी ठरली यावेळी त्यांच्या समवेत बाल रक्षक चळवळीचे जिल्हा समन्वयक डॉ  दादाराव शिरसाठ केंद्रप्रमुख टी पी  पाटील व उपक्रमशील शिक्षक रवी ढगे व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)