सरदारनगर शाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

तळोदा तालुक्यातील सरदारनगर पुनर्वसन क्र. २ येथील कुमारी यो. ई. मराठे माध्यमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शाडू मातीपासून गणपती बनवा कार्यशाळेसाठी शाळेतील कलाशिक्षक शैलेंद्र पवार यांनी शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः मातीचा गणपती बनवून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनीही सहजतेने मग अशा मूर्ती साकारल्या. वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती स्वतःला करता आल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर होता. 


या  कार्यशाळेसाठी के.एम.खैरनार, एस.एन.शिरसाठ, डी.एन.देवरे ,एस.जे.पावरा , आर.बी.पाटील, कलाशिक्षक एस.आर.पवार , श्रीमती आर. ए. कलाल, एस.आय. मगरे, यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत संस्थेचे अध्यक्ष आय.एच.पोटे व भाऊसाहेब एम.एच.पोटे व ग्रामस्थांनी या कार्यशाळेचे कौतुक केले. या कार्यशाळेप्रसंगी उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवावे आणि इतरांनाही प्रेरित करण्याचे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती पी.डी. मराठे यांनी केले .




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)