इको फ्रेंडली गणेश उत्सवास मुलांचा प्रतिसाद

शालेयवृत्त सेवा
0

 



 निर्मला स्वच्छताबाबत जनजागृती करणार !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून मातीपासून गणेशाची मूर्ती कशी तयार करावी व गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य नदीत टाकल्यामुळे होणारे जल प्रदूषण याविषयी माहिती दाखवून प्रत्यक्ष मुलांकडून गणेशाच्या सुंदर मुर्त्या तयार करून घेतल्या  व ह्याच मुर्त्या मुले आपल्या घरी स्थापना करत आहेत यामुळे मुलांना इको फ्रेंडली गणेश उत्सव ही संकल्पना समजली व त्यांनी प्रत्यक्ष अवलंबली.

 

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी येणाऱ्या काळात सर्वांनीच मातीपासून तयार होणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्तीचे स्थापना करणे अत्यंत आवश्यक असणार आहे तसेच सर्व मुले गावातील गणेश मंडळाकडे जाऊन निर्माल्य स्वच्छता अभियाना संदर्भात जनजागृती करणार आहेत. 


यात 11 दिवसाचे श्री गणेशाला वाहिलेले निर्माल्य यात केळीचे खांब, हार, फुल, पत्रवाळी आदींचा समावेश असतो हे सर्व पाण्यात न टाकता शेतात एक खड्डा करून पुरून टाकल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो या संदर्भाने मुलांना मार्गदर्शन केले असून यात श्रावणी येडे ,वेदिका गिरी, नंदिनी ढगे ,चैतन्य ढेपे सोनाक्षी भोंग ,महेश सोरटे साईनाथ वाघमारे ,दैवदीप गुंडेकर ,प्रदीप चव्हाण आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)