विद्यार्थ्यांनी नवीन नवीन संकल्पना आकारात आणून नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग तयार केले पाहिजे - मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे | District Science Exhibition

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :

आयुष्याला शिस्त आणि स्वतः प्रति असलेला विश्वास आपल्याला बळ देत असते विज्ञानात आपल्या जिज्ञासेला वाव मिळतो म्हणून विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना आकारात आणून नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग तयार केले पाहिजे. यात मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्याची सजनशीलता वाढते व मुलांमधील सुप्त शक्तीचा विकास होतो असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. 


शिक्षण विभाग नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. मुख्याध्यापिका डीवी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड वाघाड शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री पावडे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर उपशिक्षणाधिकारी प्रदीप बनसोडे गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे आधीचे यावेळी उपस्थिती होती. 


पुढे बोलताना त्या म्हणाल्या मुलांमध्ये प्रचंड कल्पना शकते त्याचा उपयोग शिक्षकांनी करून घेणे आवश्यक आहे इतर विषयासह विज्ञान विषयात विद्यार्थ्यांचे रुची वाढवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. विज्ञानातले नवेनवे प्रयोग विद्यार्थ्यांना शिकवावेत विज्ञान प्रदर्शनातून अनेक शास्त्रज्ञ देशाला मिळू शकतात असेही त्या म्हणाल्या. आपल्याला काय व्हायचे ते मुलांनी शाळेपासूनच ठरवावे मोबाईल व टीव्ही मध्ये वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्यावे तर आपण निश्चित ध्येय गाठू शकतो. शास्त्रज्ञ होण्यासाठी विज्ञान विषयात रुची ठेवणे विज्ञानाचे नवेनवे प्रयोग सादर करावे विज्ञान कथा वाचाव्यात शाळांमधून आठवड्यातून एक तास गोष्टीचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावावी असेही त्या म्हणाल्या. 


यावेळी तालुक्यातील 84 शाळांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता यावेळी विना इलेक्ट्रिकल प्रदूषण यंत्र संच सौर विद्युत घट आधुनिक शेती मळणी यंत्र इलेक्ट्रिक उपकरण भूकंप रोधक प्रकल्प डिजिटल सायकल कचऱ्यापासून विद्युत निर्मिती आधी विज्ञान प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते विज्ञान प्रदर्शनातून इयत्ता सहावी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी या दोन गटातून प्रतिकेतील उत्कृष्ट क्रमांक काढण्यात येणार आहेत. 


यावेळी शिक्षण विभागाचे अध्यक्ष गंजवार सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर विलास ढवळे मिलिंद ढवळे विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी लता कवठेकर डी टी शिरसाठ प्रशांत सोनकर शिक्षक विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)