राष्ट्रीय ध्वजारोहनाबाबत महत्वाचे : शासकिय -निमशासकिय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्यासाठी

शालेयवृत्त सेवा
0

 


११ , १२ आणि १३ ऑगस्टच्या ध्वजारोहण संबंधी


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

           ग्रामविकास व पंचायतराज विभागाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी २१ जुलै २०२२ च्या विशेष आदेशान्वये दिनांक १३, १४ व १५ ऑगस्ट २०२२ तीनही दिवशी शासकीय /निमशासकीय शाळा व कार्यालयात ध्वजसंहितेप्रमाणे कार्यालय प्रमुखांच्या हस्ते सकाळी ९ पूर्वी ध्वजारोहन करावयाचे आहे आणि सूर्यास्तापूर्वी म्हणजे अंदाजे सायंकळी ६.०० पूर्वी ध्वजअवतरण (ध्वज उतरवणे) करावयाचेच आहे. सर्व शाळा / कार्यालयासाठी दररोज ध्वजारोहन व ध्वजअवतरण करावयाचे आहे.


          सामान्य नागरिकांनी मात्र  १३ ऑगस्टला सूर्योदयानंतर ध्वजारोहन करावयाचे आहे ( नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.वर्षा ठाकूर-घूगे मॅडम (IAS) यांनी शक्यतो घरच्या महिलेच्या हस्ते ध्वजारोहन करण्याचे आवाहनास आपण सकारात्मक प्रतिसाद दयावा) व थेट १५ ऑगस्ट २०२२ ला सूर्यास्तापूर्वी ध्वजअवतरण करावयाचे आहे. केवळ सामान्य नागरिकांना दररोजच्या ध्वजारोहन व ध्वजअवतरणाच्या प्रक्रियेतून विशेष सुट दिलेली आहे. सामान्यतः दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्टला ज्या प्रमाणे आपण मुख्य समारंभ, प्रभातफेरी व तत्सम कार्यक्रम घेतो तसा यावर्षीही घेता येतील. अधिक माहितीसाठी सोबतच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे २१ जुलै २०२२ च्या विशेष आदेशाचे अवलोकन करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)