आता शासकिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 34 टक्के ! | Maharashtra announces 3 %da hike to govt employees

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. तो आता दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३१% वरुन ३४% करण्यात यावा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.


 

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२२ ते दिनांक ३१ जुलै, २०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.



यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा असे आदेशीत करण्यात आले आहे.



वाचा : शासन निर्णय क्रमांकः मभवा- १३२२/प्र. क्र. ८ / सेवा-९ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)