जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे आगळीवेगळी दहीहंडी शेतकऱ्यांच्या हस्ते फोडली दहीहंडी !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मारतळा दिनांक 19 ऑगस्ट 2022 मारतळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या संकल्पनेतून दहीहंडी निमित्ताने वर्ग पहिली ते सातवीच्या मुलांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने दहीहंडी साजरी केली. 


यात प्रामुख्याने आपल्या परिसरातील व्यवसायिकांची ओळख व्हावी हे सुद्धा इंग्रजी मधून आपल्या व्यवसायिकांना इंग्रजीतून काय म्हणतात याची ओळख व्हावी म्हणून बारा बलुतेदार व्यवसायिकाचे पोस्टर मराठी व इंग्रजीतून तयार करून यात शेतकरी ,शिक्षक ,सोनार लोहार, कुंभार, चांभार, सैनिक ,शिपाई ,डॉक्टर आदींचा समावेश होता तसेच काही मुलांनी कृष्ण व राधा त्यांची वेशभूषा परिधान करून आले होते शेवटी जगाचा पोशिंदा असलेला व्यवसायिक शेतकरी  बनलेल्या मुलाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. 


सर्वांनी सामूहिक नृत्य करून दहीहंडीची सांगता झाली यामुळे मुलांना व्यवसायिकांची ओळख इंग्रजी मधून झाली या आगळ्यावेगळ्या दहीहंडीमुळे मुलांच्या ज्ञानात भर पडली सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे, जयश्री बारोळे ,माधुरी मलदोडे उज्वला जोशी रमेश हनुमंते यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देवबा होळकर, प्रल्हाद पवार ,बालाजी प्यारलावार व विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)