' हर घर तिरंगा ' अंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर -घुगे यांचा स्वयंसहायता गटासी ऑनलाईन संवाद .. | CEO Varsha Thakur

शालेयवृत्त सेवा
0

 



ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील १ लाख ५० हजार घरावर महिलांच्या हस्ते तिरंगा फडकणार !


नांदेड (शालेय वृत्तसेवा) : 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा उपक्रमांत बाबत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ५ लाख घरावर तिरंगा फडकवणार असून किमान दीड लाख महिला आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे.


भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्यलढाच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्त आज झूम मीटिंग द्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहातील सदस्याशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय दुबाकले, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार व जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार यांची उपस्थिती होती.


तिरंगा फडकवताना तिरंग्याचा कुठेही अपमान होऊ नये याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. राष्ट्रीय ध्वज हा हाताने कापलेला विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला कापडी खादी पॉलिस्टर किंवा लोकरी पासून तयार केलेला असावा. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. तिरंग्याचा आकार 3:2 या प्रमाणात राहील. तिरंगा चा केशरी रंग हा वरच्या बाजूला आणि हिरवा रंग हा खालच्या बाजूला असावा.


 राष्ट्रध्वजस्तंभाच्या वरच्या टोकाला लावावा. या ध्वजावर इतर कोणताही ध्वज सोबत लावू नये. राष्ट्रध्वजावर कोणतेही अक्षर किंवा चिन्ह लिहू नये. तसेच स्तंभाच्यावर आणि आजूबाजूला काहीही लावू नये. राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला मळलेला अथवा चुरगळलेला असू नये. तसेच राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे तोरण गुच्छ अथवा पताका म्हणून वापर करू नये. ध्वज फाटणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सन्मानाने आणि सावधतेने उतरवावा. राष्ट्रध्वज उतरल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. आपला राष्ट्रध्वस्त तिरंगा हा आपला अभिमान आणि अस्मिता असल्याचेही वर्षा ठाकूर गुगे म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)