जिल्हा परिषद नांदेडचा अभिनव उपक्रम : जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस होणार राष्ट्रभक्तीचे समुहगान ! | Z P Nanded

शालेयवृत्त सेवा
0

 



जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या संकल्पनेतून साकारलेला उपक्रम !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ):

जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या संकल्पनेतून 'हर घर तिरंगा ' दिनांक 10 ऑगस्ट सकाळी 10 वाजता राष्ट्रभक्तीपर 10 गीतांचे समूहगान सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये  होणार आहेत.


  

हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.  दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या 3739 शाळांमधून देशभक्तीपर समूहगीत गायनाच्या आयोजन करण्यात आले आहे.


प्रत्येक गीतातील एक कडवे याप्रमाणे दहा गाण्यांमधील दहा कडव्यांचा संच असलेली ध्वनिमुद्रिका आपणास शेअर करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त सराव 8 आणि 9 तारखेला मुलांकडून करून घ्यावा आणि 10 ऑगस्टला सकाळी दहा वाजता सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी समूहाने गीत सादर करावे.

 

जिल्ह्यातील 6 लाख 68 हजार विद्यार्थी यात सहभागी होतील. सर्व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहतील याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यावयाची आहे. शिक्षकांनी या दिवशी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे.


गटशिक्षणाधिकारी ,शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख या पर्यवेक्षकीय यंत्रणांनी हा सर्व कार्यक्रम यशस्वी होईल असे नियोजन करायचे आहे. मुले गीत गातानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्या आवश्यक फोटोज काढाव्यात आणि त्या समाज माध्यमावर प्रसारित कराव्यात.



स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा भव्य कार्यक्रम असून आपण सर्वजण याचे यशस्वीतेसाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे.

   - वर्षा ठाकूर- घुगे



खालिल १० गीतांचे समुहगान होणार..

- वंदे मातरम

- जयोस्तुते श्री मह्ममंगले

- नन्ना मुन्ना राही हू

- आओ बच्चो तुम्हे दिखाये

- छोडो कल की बाते

- हम होंगे कामयाब

- सारे जहाँ से अच्छा

- विजयी विश्व तिरंगा प्यारा

- बलसागर भारत होवो

- ये देश है वीर जवानों का..

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)