"एक धागा शौर्याचा एक राखी अभिमानाची" अल अमीन मराठी प्रायमरी स्कूलचा अनोखा उपक्रम. .

शालेयवृत्त सेवा
0

  


उपक्रमशील शिक्षिका अस्मा नदाफ यांचा उपक्रम ।


सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :

शंभर फुटी परिसरातील सरोवर शिक्षण मंडळ सांगली संचलित अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल सांगली येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत रंग राखीचा तिरंगा या उपक्रमाअंतर्गत इयत्ता सातवी व वर्ग शिक्षिका सौ.अस्मा नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली एक धागा शौर्याचा एक राखी अभिमानाची हा उपक्रम घेण्यात आला. 


प्रत्येक वर्षी आपल्या देशाच्या सीमेवरती तैनात असलेल्या डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करणारे बहादुर सैनिक यांना स्वनिर्मित राख्या तयार करून पाठवण्यात येतात परंतु या वर्षी  आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होणार म्हणून रंग राखीचा तिरंगा हा उपक्रमाअंतर्गत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी एक दोन नाही तर तब्बल 70 तिरंगा राख्या तयार स्वनिर्मित तयार करण्यात आले आहेत.


या सर्व राख्या आपल्या सीमेवर ती तैनात असणाऱ्या सैनिकांना पाठवण्यात आले आहेत. ह्या उपक्रमासाठी मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक हाजी  मुनीर उद्दिन मुल्ला सर, अध्यक्ष श्री. एफ. एम. अकिवाटे व मुख्याध्यापिका सौ. शहनाज मुल्ला मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)