lI निपुण प्रतिज्ञा II
आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्वजण
महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण
कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक
वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत.
आपण सारे मिळून, आपल्या मुलांसाठी निखळ
आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी,
अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी, मुक्त छंद
जोपासणारी, नेतृत्वाच्या संधी देणारी आणि
आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया.. आपण
सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया.. जिथे बालके
अर्थपूर्ण वाचन, हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार
प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विदयार्थी
राहतील...
अशाप्रकारे, महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास
आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन 'निपुण
बालक' घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .