यशोदाबाई जोगी विद्यालयातील 21 विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृती परिक्षेत मिळविले यश !

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर व्दारा संचलित किनवट तालुक्यातील श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय, दहेली येथील विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृती परीक्षेत निकालाची परंपरा कायम राखीत यावर्षी 21 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उच्चांक गाठून सुयश प्राप्त केले आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. 


या सुयशा बद्दल संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, सचिव अरुणजी कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ, गशिअ अनिलकुमार महामुने, शिक्षणविस्तार अधिकारी आर.आर.जाधव, केंद्र प्रमुख गंगाधर शेर्लावार ,मुख्याध्यापक पी.आर.वाडेकर, सर्व शिक्षकवृंदानी व पालकांनी अभिनंदन करुन भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)