बंद असलेली शाळा शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा चालू केल्यामुळे गावकरी आनंदीत !

शालेयवृत्त सेवा
0


        

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

लोहा तालुक्यातील सुनेगाव केंद्रांतर्गत गांधीनगर वस्तीची विद्यार्थी संख्या अभावी तांत्रिक अडचणीमुळे मागील चार वर्षापासून बंद असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा चालू करण्याचे शिक्षणाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आनंदीत झाले आहे.


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा नुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण मिळावे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील, वाडी वस्तीवरील मूले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, याकरिता नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा. प्रशांतजी दिग्रसकर साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. दिलीप बनसोडे साहेब तसेच लोह्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. रवींद्रजी सोनटक्के साहेब यांनी नदीपात्रातून दोन किमी पायपीट करुन धानोरा (म.) ते गांधीनगर रस्त्याची पाहणी करत असताना पाण्याच्या प्रवाहात साप आढळून आला. खरच मुलांच्या जीवितास किती धोका आहे. पावसाळ्यात नदीपात्रातून, चिखलातून, अडचणीच्या वाटेने मुले शाळेत कशी जात असतील? असे शिक्षणाधिकारी महोदयांनी बोलून दाखवले. 


ही सर्व परिस्थिती पाहून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान, गैरसोय आणि विद्यार्थ्यांच्या जीवितास असणारा धोका लक्षात घेवून चार वर्षापासून तांत्रिक अडचणीमुळे बंद असलेली शाळा ताबडतोब चालु करण्यासाठी प्रत्यक्षात त्या वस्तीवर जाऊन गावकऱ्यांशी चर्चा करून शाळा चालू करण्याचे आदेश देऊन प्रत्यक्ष शाळा चालू केल्यामुळे आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जातीने लक्ष घालून सोडवल्यामुळे गावकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे. तसेच गांधीनगर येथील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवल्याबद्दल सबंध शिक्षक वर्गातून व लोहा तालुक्यातील जनतेतून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)