वैजाली जि.प. शाळेतील १५ मुलांच्या शिक्षकांनीच केल्या केसं कटींग !

शालेयवृत्त सेवा
0

 


 

 भरत पावरा आणि गोपाल गावीत या शिक्षकांची ही सेवा समाजाला प्रेरणा देणारी !


नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेतील अनेक मुलांना आई-वडील यांच्या घरातील मुलांची परिस्थिती गरिबीची आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च शाळेस करावा लागतो. एरवी, गरीब मुलांचे केस कटिंग शाळेतील शिक्षक भरत पावरा, गोपाल गावीत यांनी शाळेतील मुलांची स्वतः कटींग केली.


शिक्षकांची ही सेवा समाजाला प्रेरणा देणारी आहे. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. हे मानसिक समाधान खरोखरच पैशात मोजता येत नाही. शाळेत आपल्या परिने काहीतरी करण्याचे ठरविले.या मूलांची सेवा करण्याचे भाग्य आपल्या हातून घडावे असे त्यांना वाटले आणि त्यांनी हा सामाजिक उपक्रम आजतागायत सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम राबवून अनेकांचे लक्ष वेधले. 


ग्रामीण भागातील चक्क १५ मुलांच्या मोफत कटींग शाळेत गोर-गरीब मुलांच्या मोफत कटींग करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिक्षकांनी आपल्या शाळेत आगळावेगळा करण्याची कल्पना आपल्या शाळेत उपक्रम सुरू करू. तिथे आपण जाऊन तुमची कल्पना प्रत्यक्ष साकारू,सुंदर मी होणार, असं प्रत्येक जण म्हणत असतं; पण सगळं जग सुंदर झालं पाहिजे, शाळेतील विद्यार्थी स्वच्छ व सहज सुंदर दिसायला हवीत, अस्वच्छ मुलांना सुंदर स्वच्छ चेहरा देण्यासाठी सुरू असलेले हे अनोखे समाजसेवी शाळा आजच्या स्वार्थी जगात अधिकच उठावदार दिसते आहे. 


 जग सुंदर झाले पाहिजे, या मनातल्या प्रामाणिक इच्छेमुळेच अधिक पण आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही व परिस्थितीमुळे स्वतःच्या बचतीचे नियोजन केले पाहिजे या हेतूने प्रेरित करण्याचं हेतू दिसून आला.येथील गोरगरीब १५ गरीब मुलांची मोफत कटिंग करून एक आगळा वेगळा उपक्रम साजरा केला. या नवख्या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुदाम यांनी शिक्षक भरत पावरा, गोपाल गावीत यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सामाजिक उपक्रमाची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा या अगळा वेगळा उपक्रमाला शाळेतील शिक्षक चंदु पाटील, राजु मोरे, श्रीमती उषा पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. वैजाली शाळेत राबविलेल्या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा होत आहे. यानिमित्ताने एक चांगला उपक्रम राबविण्यात आला.असेही प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)