शेगवे जि.प.शाळेला केंद्र सरकारचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार दि.१( प्रतिनिधी गोपाल गावीत) :

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेमध्ये जिल्हयातील जिल्हा परिषद शेगवे शाळेला ग्रामीण जिल्हास्तर स्वच्छ विद्यालय पुरस्कार नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेगवे शाळेला सन २००२१-२२ स्वच्छ विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . 


जिल्हयातील अनेक शाळांनी आॅनलाईन सर्वेक्षण नोंदणी स्वंयमुल्यमापन पूर्ण करून स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्वच्छ विद्यालय पुरस्काराची माहिती ऑनलाईन भरण्यात आली होती. त्या आधारावर जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडून क्रॉस वेरिफिकेशन करण्यात आले. त्या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये ज्या शाळांची रेटिंग जास्त होती त्यांची निवड करण्यात आली. 


जिल्ह्यातून अशा ३४ शाळांची निवड करण्यात आली. पुरस्कारासाठी राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय अनुदानित व खाजगी शाळा पात्र असून जिल्ह्यातील शाळांनी यासाठी नामांकन सादर करण्यात आले होते या स्पर्धेसाठी विविध घटकांमध्ये शाळांना माहिती भरण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगवे या शाळेला सब कॅटेगिरी मध्ये पाणी व्यवस्थापन व देखभाल आणि दुरुस्ती, शाळा सुधार, स्वच्छता पद्धतीमध्ये सुधार होण्यासाठी शाळा व विद्यार्थी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शौचालय सुविधा, हात धुण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, कोविड १९ आधारित ५९निकषांवर मुल्यमापन करण्यात आले होते.  या सब कॅटेगिरी मध्ये फाईव्ह स्टार रेंटीग मिळाली आहे व ऑल ओव्हर स्कूल मध्ये शेगवे जिल्हा परिषद शाळेला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेली आहे. 


नंदुरबार जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम , उपशिक्षणाधिकारी डाॅ. युनूस पठाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नारायण सोनवणे व त्यांचे सहकारी राजू लक्ष्मण गावित उपस्थित होते. 


दोन्ही शिक्षकांनी लोकसहभागातून खूप मेहनत घेऊन शाळा अतिशय सुंदर स्वच्छ आणि देखणी केली आहे. त्यांनी सांगितले की , पुरस्काराचे श्रेय सरपंच कांतीलाल दादा गावीत, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य शामसिंग दादा गावीत, सदस्य सुरेखाताई गावीत तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हीनुताई गावीत, उपाध्यक्ष आकाश गावीत तसेच वीर आदिवासी एकलव्य संघ नंदुरबार शाखा नवापूर तालुकाध्यक्ष कैलास गावीत, उपाध्यक्ष निखिल गावीत तसेच पालकवर्ग यांना द्यावे लागेल. असेही मत मुख्याध्यापक सुनिल सोनवणे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)