रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळेत विद्यार्थ्यांना लोकसहभागातून ३५ हजार रुपयांचे ट्रॅकिंग सूट वाटप..

शालेयवृत्त सेवा
0


जिल्हा परिषद सदस्य शकुंतलाताई सुरेश शिंत्रे व शेतकी संघाचे संचालक सुरेश फकीरा शिंत्रे यांच्या नातीच्या वाढदिवसा निमित्त उपक्रम !


 ◼️मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथजी गावडे यांच्याहस्ते वॉटर फिल्टर उपकरणाचे  उद्घाटन !

     

नंदुरबार ( प्रतिनिधी गोपाल गावीत ) :

नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा रनाळे येथे जिल्हा परिषद सदस्य शकुंतलाताई सुरेश शिंत्रे व शेतकी संघाचे संचालक सुरेश फकीरा शिंत्रे यांच्या नातीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून इयत्ता पहिली ते चौथीच्या १०७ मुलींना अक्षरी ३४ हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचे ट्रॅक सूट जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथजी गावडे साहेब यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.


 त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मार्फत पुरविण्यात आलेल्या वॉटर फिल्टर उपकरणाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथजी गावडे साहेब व रनाळे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शकुंतलाताई सुरेश शिंत्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य बेगाबाई भिल ,सुरेश शिंत्रे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी  जयंत चौरे,सचिन गोसावी, गोकुळ नागरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छायाताई भिल, केंद्रप्रमुख वसंत पाटील व बहुसंख्य पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते .


याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील व सहकारी शिक्षकांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली व विद्यार्थिनींना खाऊ साठी एक हजार एक रुपये दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य शकुंतलाताई शिंत्रे, पंचायत समिती सदस्य बेगाबाई भिल, सुरेश शिंत्रे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी,केंद्रप्रमुख वसंत पाटील, गोकुळ नागरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छायाताई भिल होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख वसंत पाटील यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अमृत पाटील, उज्वला पाटील, रेखा मुरकेवार ,मंगेश वसावे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)