शासन व लोकसहभागातून जिल्हा परिषद रनाळे कन्या शाळेत आरओ वाॅटर फिल्टर..

शालेयवृत्त सेवा
0


नंदुरबार  ( गोपाल गावित ) :

शाळेतील विद्यार्थिनींना शुद्ध व गार पाणी देण्यासाठी रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळेत शासन व लोकसहभागातून आरओ वॉटर  फिल्टर बसविण्यात आले आहे . यासाठी कायमस्वरूपी लोखंडी शेड तयार करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना थंड व शुद्ध पाणी  मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने शाळांना आरओ वॉटर फिल्टर उपकरण पुरविले आहे. रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळेला देखील अशा प्रकारचे मिळाले. 


उपकरण परंतु ते बसविण्यासाठी लागणारा खर्च मोठा होता. विद्यार्थिनींना शुद्ध पाणी मिळण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सर्व खर्च मजुरीसह १८ हजार ७०० रुपये आला . यासाठी दोन दात्यांनी पुढाकार घेत दहा हजार रुपयांची मदत केली . उर्वरित आठ हजार सातशे रुपये मुख्याध्यापक पाटील यांनी खर्च केले. शासकीय खर्च एक लाखापर्यंत आला असता. त्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमार्फत हे सर्व साहित्य उपलब्ध करण्यासाठी इस्टिमेट तयार करणे, त्याची मंजुरी घेणे ते अनुदान प्राप्त होणे या सर्व प्रक्रियेला दोन ते तीन महिने लागले असते.


रनाळे जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी सर्व अडीअडचणींवर मात करीत विद्यार्थ्यांना आरओचे थंड पाणी पिण्यासाठी आरओ उपकरण कार्यान्वित केले. त्यासाठी पाण्याची टाकी ठेवण्यासाठी दहा फूट उंचीचे लोखंडी स्टॅन्ड तयार करावे लागले . तसेच उपकरण मोकळ्या जागेत सुरक्षित रहावे यासाठी पत्र्याचे शेड तयार करण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती झाली असती. यासाठी मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी कल्पकतेतून शाळा व्यवस्थापन समिती व  गावकऱ्यांचे सहकार्य घेत हे काम पूर्ण करून ते कार्यान्वित केले . सहकारी शिक्षक उज्वला पाटील, रेखा मुरकेवार, मंगेश वसावे यांचे सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)