नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मागील अनेक वर्षापासून औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विक्रमजी काळे व युवा प्रतिष्ठान नांदेडचे निमंत्रक श्री मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा या शाळेत उपक्रमशील शिक्षक रवी ढगे वाढदिवसा निमित्ताने शालेय साहित्याचे नियमितपणे वाटप करतात.
यावर्षी सुद्धा वर्ग 5 वि ते 7 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे शब्दार्थाचे पुस्तक वाटप करण्यात आले आले असून येणारा काळ हा इंग्रजीचा असणार असून जागतिक स्तरावर संपर्क साधणारी भाषा म्हणून इंग्रजी कडे पाहिले जाते म्हणून तर म्हटले जाते इंग्रजीवर ज्यांची कमांड त्याला जगामध्ये डिमांड यामुळेच शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांच्या इंग्रजी च्या ज्ञानामध्ये भर पडावी अचूक इंग्रजी त्यांना वाचता यावी इंग्रजीत संवाद साधता यावा या सर्वांसाठीच उपयुक्त असा नाविन्यपूर्ण उपक्रम औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विक्रम काळे व युवा प्रतिष्ठान नांदेडचे निमंत्रक मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव ढेपे केंद्राचे केंद्रप्रमुख टी पी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
नंतर सर्वांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमदार काळे साहेब व युवा प्रतिष्ठान चे निमंत्रक मिलिंद देशमुख यांच्याशी संवाद साधून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी यावेळी दोघांनीही कृतज्ञता व्यक्त करून शाळेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काही दिवसात शाळेला प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे सुद्धा आवर्जून सांगितले सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे डी डी होळकर प्रल्हाद पवार श्रीमती उज्वला जोशी माधुरी मलवडे जयश्री बारोळे बालाजी प्यारलावार उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .