नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :
नवापूर तालुक्यातील जि प शाळा बोरवण येथे शनिवार फनिवार उपक्रमांतर्गत. सकाळी कवायत घेऊन भात लावणी उपक्रम घेतला. सर्व विद्यार्थ्यांना जवळच अनिल गावीत ( बोरवण )यांच्या शेतात नेऊन प्रत्यक्ष भातलावणी केली. सहज सर्व मुलांना विचारले भात लावणी ला जायचे का? मला वाटले आपल्या परिसरात सरास भात लावणी होते. मुलं तयार होणार नाही. परंतु एका शब्दात विद्यार्थी भात लावण्यासाठी तयार झाले.
सर्व मुलांनी आज भातलावणीचा आनंद घेतला यावरून शेतकरी किती मेहनत करतो हे विद्यार्थ्यांनी पाहिले. व प्रत्यक्ष अनुभवले यावर शिक्षक श्री दिलीप गावित यांनी अन्न वाया घालू नये असे सांगितले. विद्यार्थी म्हणाले आम्हाला लागेल तेवढेच आम्ही घेणार कारण शेतकऱ्याला खूप मेहनत लागते. मुख्याध्यापक श्री दिलीप गावित यांनी भातलावणी विषयी संपूर्ण माहिती विदयाथ्योँना दिली. शेतीसाठी लागणारी मेहनत नांगरणे, पेरणी, उफाळणे, बेनणे, झोडपणी या सर्व शेतीच्या कामांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
अन्नाचे महत्त्व पटवून देऊन धान्य पिकवण्यासाठी लागणारी मेहनत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनाही संकल्प केला की आम्ही आम्हाला लागेल तेवढेच अन्न घेणार अन्न वाया घालणार नाही. विद्यार्थ्यांनी भात लावणी करता करता धरतीची आम्ही लेकरे ही कविता तालासुरात गायन केले त्याचा आनंद लुटता लुटता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भात लावणीचा आनंद लुटला.
" विद्यार्थ्यांना अन्न वाया घालवू नये किंवा कसरत याविषयी शिकवताना जेव्हा प्रत्यक्ष अनुभूती दिली जाते. त्यावेळेस ते मूल्य व्यवस्थित रूजतं त्यामुळेच हा उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना आनंदमय शिक्षण देण्याचा व प्रत्यक्ष कृतीतून मूल्य रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. "
- दिलीप गावीत / उपक्रमशील शिक्षक
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .