बिजप्लॉटचा जि.प शाळेचा ४० वा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न !
नंदुरबार ( प्रतिनिधी गोपाल गावित)
शहादा तालुक्यातील जि. प.शाळा,बिजप्लॉटचा शाळेचा ४० वा वर्धापनदिन व ग्रामसेवक देवनाथ साळवे यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. आमोदा केंद्रातील जिल्हा परिषद शाळा बिजप्लॉट शाळेचा ४० वा वर्धापनदिन लोकसहभागातून आनंदात साजरा करण्यात आला.
आपण आपला स्वतःचा, आपल्या मुलांबाळांचा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचा वाढदिवस किती आनंदाने साजरा करतो बरे. मग आपल्याला शिक्षण देणारी, आपल्या आई सारखी आपल्या संरक्षण देणारी व आपल्या घडविणारी आपली शाळा आहे तिचा पण वाढदिवस आपण का करू नये? बरे ही संकल्पना आमच्या शाळेतील सहकारी शिक्षक दीपक नागमल सरांच्या लक्षात आली. शालेय व्यवस्थापन समितीची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील घेण्यात आलेल्या पहिल्या सभेमध्ये त्यांनी आपले विचार मांडले, आणि त्वरित शालेय व्यवस्थापन समिती आणि उपस्थित गावकऱ्यांनी या विचाराला मान्यता देऊन आपण आपल्या शाळेचा वाढदिवस म्हणजेच ४०वा वर्धापन दिन साजरा करूया हे निश्चित करण्यात आले होते.
लोकसहभागातून आपल्या शाळेचा वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा करायचा हा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आणि गावाचे सरपंच नर्मद्या पावरा, पोलीस पाटील लुका पावरा, शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक सभासदांनी मिळून तसेच शिक्षकांनी सुद्धा सहभाग घेऊन लोकवर्गणीतून हा कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला. रामपूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आप्पा देवनाथ साळवे यांचा निरोप समारंभ एकत्रितपणे आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील तावडे शिक्षण विस्तार अधिकारी होते, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश नाईक जि.प.सदस्य तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि माझी सभापती, सौ.कमलताई जाधव ठाकरे (पंचायत समिती सदस्य, डॉ. बलराज पावरा,डॉ. प्रकाश पावरा, डॉ.जाधव ठाकरे, वनसिंग खर्डे (कृषी सहाय्यक), लुका आदरजी पावरा (पोलीस पाटील),नर्मदया गुलाब पावरा (सरपंच), देवनाथ साळवे (ग्रामसेवक) सौ. दीक्षा देवनाथ साळवे, उदयसिंग गुरुजी, केशव पावरा, भरतसिंग सुदाम नावडे, रामसिंश्रीग पावरा (माजी उपसरपंच), दिलीसिंग ठाकरे (माजी सरपंच), भावसिंग खर्डे (ग्रामपंचायत सदस्य) तथा धनसिंग खर्डे (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष) सौ. मनीषा पावरा (शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष), सत्तरसिंग जत्रू खर्डे (माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष), शांतीलाल पावरा, सौ. मनीषा शांतीलाल पावरा (माता-पालक संघ अध्यक्षा) किसन पावरा (शिक्षक पालक संघ अध्यक्ष), प्रवीण कुंभार सर (मुख्याध्यापक,आश्रम शाळा रामपूर), बिपिन सोनवणे सर (जि प शाळा,रामपूर) उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमोदा केंद्राचे केंद्रप्रमुख वाय. बी. मोरे सर उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे सविस्तरपणे सूत्रसंचालन अनुप प्रेमसिंग राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप माणिक चाटे सर जि. प शाळा फत्तेपुर यांनी केले.
कार्यक्रमाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी दिपक भगवान नागमल सर यांनी मेहेनत घेतली व चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. गावातील लहानथोर आजी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सर्व जबाबदारी पार पाडली, शाळेबद्दलची आपली मते व अनुभव सांगितले. गावातील प्रत्येक पालक व उपस्थित नागरिक यांनी मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केले. निरोप स्विकारतांना देवनाथ साळवे आप्पानीं गावाबद्दलचे प्रेम व गावकऱ्यांनी दिलेली मागील १० वर्षाची प्रेमळ वागणुक,आपुलकी बद्दल मत मांडताना ते गहिवरून आले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .