जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुलांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून केले अभिनंदन !

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मारतळा दिनांक 30 जुलै 2022 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे  सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांना उपक्रमशील बनवत आहेत याचाच एक भाग म्हणून मार्गदर्शनाखाली वर्ग एक पत्र देशाच्या प्रथम नागरिकांला या उपक्रमांतर्गत शाळेतील पाचवी ते सातवीच्या मुलांनी देशाच्या नवनियुक्त पंधराव्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मूर्मु  यांना अभिनंदन करणारे पत्र लिहिले.  


काही दिवसापूर्वी देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियावर व प्रिंट मीडियावर राष्ट्रपतींचे नाव येत होते मुलं ते ऐकत होते टीव्हीवर सुद्धा पाहत होते आणि त्यांनाच पत्र लिहायचं म्हटल्यावर मुले आनंदाने सहभागी झाले श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी काही काळ शिक्षक म्हणून आपली सेवा बजावली असल्याचे मुलांना समजले होते ते त्यामुळे मुलांनी पोस्ट कार्डवर आकर्षक सजावट करून अनोख्या पद्धतीने त्यांचे अभिनंदन केले. 


देशाच्या पहिल्या नागरिकाला म्हणजे राष्ट्रपतीला पत्र लिहिण्याचा शाळेतील मुलांचा हा अनुभव पहिलाच होता त्यामुळे मुले आनंदाने या उपक्रमात सहभागी झाले आम्ही पाठवलेल्या अभिनंदन  पत्राची राष्ट्रपती नक्कीच दखल घेतील असा विश्वास उपक्रमशील शिक्षक रवी ढगे व सर्व मुलांना आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट मुगावे ,देवबा होळकर, उज्वला जोशी ,जयश्री बारोळे माधुरी मलदोडे व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)