आधार एक पाऊल मानवतेकडेच्या संकल्पासह शिक्षण परिषद संपन्न....!

शालेयवृत्त सेवा
0

 


           

नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :

आनंतवाडी /कुपटी ता. माहूर येथे  केंद्रस्तरीय द्वितीय शिक्षण परिषद अध्यक्ष केंद्रप्रमुख सुरेश मोकले व प्राचार्य गजानन भारती व मुख्याध्यापक आशिष माहुरे यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतेच आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पणासह दिप प्रज्वलन करून झाले .  गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार व शि .वि .अ. सुधीर गुठे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

           

यावेळी  संतोष किडे यांनी विद्या प्रवेश या विषयावर समर्पक विश्लेषण करून सादरीकरण केले. तर आदर्श पाठाचे ज्ञानरचनावादा सह अध्यापनातील नाविन्यपूर्ण विविध पैलूला हात घालत जिल्हा परिषद शाळा कर्तारसिंग तांड्याचे मुख्याध्यापक दत्ता पहाडे यांनी सादरीकरण केले.

                

त्यावर आधारित चर्चा  नवीनकुमार अरगुलवार यांनी तर शिकू आनंदे व गणितीय क्रियावर सुलभक मारुती तमन्ना यांनी तर सेतू अभ्यासक्रमावर समर्पक व आढावात्मक मार्गदर्शन अर्चना पवळे यांनी केले.


              कै. देवरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गजानन भारती यांनी अनाथ विद्यार्थ्यांना कुठेतरी मायेचा हात हा सामाजिक उत्तरदायित्वपोटी शिक्षक बांधवाकडून मिळावा जेणेकरून  कोरोना सारख्या महामारीत अथवा ज्ञात-अज्ञात कारणाने आई- वडीला विना पोरकी झालेल्या मुला मुलींना शैक्षणिक उत्तरदायित्वासाठी दत्तक घेऊन त्यांचा वार्षिक खर्च उचलण्याचे आवाहन केले आहे तर मुख्याध्यापक आशिष माहुरे यांनी आपल्या कार्यालयीन कामात आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोकले व सर्व शिक्षक यांचा लौकिक असून शिक्षक बांधव त्यांची उत्तम अंमलबजावणी करत असल्याचे समाधान व्यक्त केले. या शिक्षण परिषद सोहळ्याचे आभार डुमणे चंद्रकांत  यांनी मानले.यावेळी अनंतवाडी केंद्राअंतर्गतच्या शाळेत सर्व शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)