शेवडी बाजीराव या केंद्राची केंद्रस्तरीय दुसरी शिक्षण परिषद संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दक्षिण विभागातील शेवडी बा. केंद्राची शैक्षणिक वर्षातील दुसरी शिक्षण परिषद जवळा पू. ये उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडली. केंद्रप्रमुख श्री नागोराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शिक्षण परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माणिक जाधव  ( ज्येष्ठ अधिव्याख्याता शिकू आनंदे ,मराठी विभाग प्रमुख , डायट नांदेड ), शा . व्य . स.  अध्यक्ष  भानुदास जाधव ,उपाध्यक्ष  ज्ञानेश्वर पावडे, शा. व्य. स . माजी अध्यक्ष माधवराव पावडे तसेच शेवडी बा. चे केन्द्रीय मुख्याध्यापक आनंदा नरवाडे , पं. स . चे विषयतज्ञ  संजय अकोले,  रामदास कस्तुरे, किरवले यांची उपस्थिती होती.


  

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरवातीलाच जि . प .  प्रा. शा .दगडगाव येथील कदम एच. एच. यांनी  नमुना पाठ या अंतर्गत इयत्ता चौथीच्या वर्गावर विज्ञान विषयाचा हवा हा आदर्श पाठ घेतला. विद्या प्रवेश इयत्ता पहिली या विषयी शासन परिपत्रक त्याअंतर्गत राबविण्याचे विविध उपक्रम ध्येय उद्दिष्टे व कार्यवाही याची सखोल व अभ्यासपूर्वक माहिती केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक  गायकवाड बी. बी.  यांनी उपस्थितांना दिली.


 कृतिपुस्तिका इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी भाषा व गणित यामधील कृती कशा कराव्या त्याचे उद्देश व गरज काय याविषयी सखोल मार्गदर्शन व सेतू अभ्यासक्रम परीक्षा प्रशासकीय सूचना देऊन आपले मोजक्या शब्दात केंद्राचे केंद्रप्रमुख तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष नागोराव जाधव यांनी विचार मांडले.



     शेवटच्या सत्रात कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्रा. डॉ. माणिक  जाधव  यांनी शिक्षण परिषद उद्देश व आवश्यकता सांगून ते राबविण्याची मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच काही मुद्द्याचा उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  जामकर  यांनी केले तर आभार प्रदर्शन  यामजले यांनी केले शेवटी  सुरूची भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदरील शिक्षण परिषदेस अंतर्गत चे मुख्याध्यापक व केंद्रांतर्गत शिक्षक /  शिक्षिका हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)