नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
शेवडी बाजीराव केंद्राची जि. प. हायस्कूल पेनुर येथे शि .वि. अ . सरस्वती आंबलवाड, केंद्रप्रमुख नागोराव जाधव यांच्या उपस्थितीत शेवडी केंद्रातील सर्व शिक्षकांची नवीन शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडली.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय मुख्याध्यापक आनंदा नरवाडे अंतर्गत सर्व मुख्याध्यापक, अंतर्गतचे शिक्षक, शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत प्रथम सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करून सुलभक उद्धव मुळे यांनी निपून भारत मिशन बद्दल सखोल मार्गदर्शन केले. निपून भारत अंतर्गत येणारा वयोगट, रूपरेषा, करावयाची अंमलबजावणी विशेष स्पष्टीकरण देऊन सर्वांचे शंकानिरसन करण्यात आले. न्यास विषयी ठळक मुद्दे , सर्वेक्षण अहवाल, वर्गाचे निवड ,करावयाची कार्यवाही सुद्धा सखोल मार्गदर्शन केले. इयत्ता पहिली यासाठी विशेष स्वरुपात राबविण्यात येत असलेल्या 'विद्याप्रवेश' उपक्रमाची माहिती आशा भालेराव पि.पि. टी . द्वारे केली तथा दैनंदिन नियोजन ,मुक्त खेळ ,पायाभूत साक्षरता, सर्जनशीलता तथा संलग्न अंगणवाडीशी संपर्क या मुद्द्याच्या आधारे अतिशय सहज व सोप्या पद्धतीने शिक्षका समोर मांडली. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन व सेतू अभ्यास तासिका भूमिका भारती राठोड यांनी पार पाडली. आपल्या प्रभावी शैलीतून पूर्वचाचणी स्तर रचना, गट तयार करणे अंतिम चाचणी यासोबतच एफ. एल. एन. उपक्रमाची माहिती अधोरेखित केली सकाळ सत्रातील शिक्षण परिषदेचा समारोप रुचकर भोजनाने करण्यात आला.
दुपार सत्रातील नियोजनाप्रमाणे जि.प.हा. पेनूर येथील मुख्याध्यापक ए .जे .कांबळे यांचा सेवापूर्ती सोहळा मान्यवर नांदेड जिल्हा डायटचे प्राचार्य रवींद्र आंबेकर साहेब, लोहा तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, अध्यक्ष मदन गवते तथा संपूर्ण शालेय व्यवस्थापन समिती जि. प. हा .पेनूर, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या आगमनानंतर निरोप मूर्ती व मान्यवरांना मानाचा फेटा बांधून प्रारंभ करण्यात आला. मान्यवर निरोप मूर्ती व उपस्थितांचे यथोचीत स्वागत करण्यात आले. जि. प. हा. पेनूर यांच्यातर्फे जोडआहेर तथा भेटवस्तु देऊन अर्जुन कांबळे सरांना सेवापूर्ती चा निरोप देण्यात आला. कदम एस. बी., भालेराव, सगर ,मुरडे , सोने, मुळे, नागोराव जाधव, नरमीटवार यांनी निरोप मूर्ती विषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्राचार्य आंबेकर यांनी उपक्रमाविषयी माहिती देत व आढावा घेत समाधान व्यक्त करून निरोप मूर्तींना सदिच्छा दिल्या. आभार प्रदर्शन सोने यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .