जि.प.कें.प्रा.नूतन शाळेच्या विद्यार्थीनीची 'नवोदय' एव्हरेस्टला गवसणी..कु.सुचिता शुद्धोदन गुंडेकर हीचे परिक्षेत यश !

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

भोकर शहरातील जिल्हा परिषदेच्या नूतन शाळेला नामवंत, किर्तीवंत, गुणवंत विद्यार्थ्यांनी आणि गुणवत्तेत दिवसेंदिवस भर घालणार्‍या इथल्या उच्चशिक्षित गुरुजनांनी आगळेवेगळे अन् अव्वल स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नूतनची गौरवाची किर्तीध्वजा सतत डौलाने उंचावत राहण्यात या सर्वांची भूमिका महत्वाची आहे. 


नुकताच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल लागला आणि निवडयादीमध्ये नूतन शाळेच्या कु.सुचिता शुद्धोदन गुंडेकर या विद्यार्थीनीने स्थान मिळवत बाजी मारली आहे. खरंतर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत यश मिळवणे हे एक प्रकारचे दिव्यच असते. त्यातही शहरी भागाला कमी प्रमाणात संधी असल्याने पुन्हा अवघड बाब. पण मनाची जिद्द आणि अभ्यासातील सातत्य असल्यास, जोडीला तज्ञांचे मार्गदर्शन असल्यास या जगात काहीही अशक्य नसते हेच कु.सुचिताने दाखवून दिले. 


जि.प.कें.प्रा.शा.नूतनमध्ये नेहमीच अभ्यासपूर्ण, नाविण्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले जातात. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी मा.डाॅ.डी.एस.मठपती साहेबांनी दाखवलेल्या नियोजनपथावर चालल्याने हे यश मिळू शकले अशी भावना या विद्यार्थीनीच्या यशात मानकरी असणार्‍या श्री.भंडरवाड एस.आर. श्री.सुरतबन्सी एस.सी. श्री.पाटील पी.एस. श्रीमती बुडकेवार एस.एन. श्रीमती हंचनाळे एस.व्ही. यांनी याप्रसंगी बोलून दाखवली.


कु.सुचिताने मिळविलेल्या या घवघवीत, दैदिप्यमान यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.वाघमारे एम.जी. साहेब, विस्तार अधिकारी श्री.शिरसाट ए.एन. साहेब, केंद्रप्रमुख श्री.पडलवार बी.जी. साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री.पट्टेवाड एम.एल. साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.गजाननरावजी चोथे तसेच नूतन शाळेतील समस्त शिक्षकवृंदांनी आणि अनेक शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे व तिच्या पुढील उज्वल आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छाही दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)