अनुकंपावरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराचे सुधारित यादी प्रसिद्ध.. लवकरच होणार नियुक्त्या | ZP Nanded

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी 181 पाच उमेदवारांची यादी www.zpnanded.in या संकेतस्थळावर आणि जिल्हा परिषदेच्या सर्व पंचायत समिती कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) सुधीर ठोंबरे यांनी कळविले आहे.


तारीख 30 जून 2022 तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या कागदपत्राची पूर्तता करून यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवाराच्या प्रस्तावात काही त्रुटी किंवा आक्षेप असल्यास संबंधित अनुकंपाधारकांनी शुक्रवारी 29 जुलै पर्यंत आपले म्हणणे लेखी पुराव्यासह जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग व सादर करावे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने पत्रकार द्वारे कळविले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)