बरडी जि.प.शाळेत बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

शालेयवृत्त सेवा
0



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बरडी येथे मा.शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लाला पाडवी, मुख्याध्यापक केश्वर वसावे उपस्थित होते. 


प्रत्येक नागरिकाने वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्यास काय हरकत आहे. वाढदिवसाला अनेक लोक अमाप पैसा खर्च करून उधळपट्टी करतात , त्याऐवजी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. असे ही मत कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी सांगितले. वृक्षारोपण करणे ही एक नीतिमत्ता , संस्कृती आहे . पूर्वजांपासून ती जपली जात आहे ; परंतु मानव एवढा कृतघ्न की , त्याने वृक्षतोड करून समृद्ध संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .


आज समाजात खास करून आदिवासी समाजात वृक्षाची पूजा करण्याची मोठी परंपरा आहे . आदिवासी निसर्गाला देव मानतात , मनोभावे पूजा करतात. बहुतांशी आदिवासी सुशिक्षित नसले तरी सुसंस्कृत आहेत.याविषयी मत ग्रामपंचायत सदस्य लाला पाडवी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाडवी यांनी केले.उपस्थितांचे आभार शिक्षक दिवाल्या वळवी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)