जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 योजनेअंतर्गत पात्र शिक्षकांनी प्रस्ताव विहित वेळेत सादर करावे..

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

उपरोक्त विषयांन्वये आपणास सुचित करण्यात येते की जिल्हा परिषद स्तरावर "जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 " करिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.


जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक प्राथमिक शिक्षक एक माध्यमिक शिक्षक आणि जिल्हास्तरावर एक विशेष शिक्षकाची निवड करण्यात येते.


पात्र शिक्षकांचे प्रस्ताव सादर करताना प्रस्तावासोबत शिक्षकाविरुद्ध कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही याबाबतचे मा. पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र, शिक्षक भ्रष्टाचार मध्ये गुंतलेला नाही किंवा त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणपत्र असावे.


संदर्भीय क्रमांक एक मधील परिपत्रकातील तरतुदीनुसार परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. सदरील पुरस्कारासाठी प्रस्तावासोबत मा. पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय आपल्या स्तरावर प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नयेत त्याचबरोबर खाजगी शाळेतील शिक्षकांचे प्रस्ताव गट शिक्षणाधिकाऱ्यांनी स्विकारू करू नये. 


ऐनवेळी सादर केलेले अथवा अपूर्ण प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही. अपात्र प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये. सोबतचे प्रपत्र अचूक भरून गुणदान करून गटविकास अधिकारी यांचे स्वाक्षरीने सादर करावेत. करिता सदरील परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 27 जुलै 2022 पर्यंत प्रस्तुत कार्याकडे सॉफ्ट व हार्ड कॉपी सह सादर करावे. अशा आशयाचे पत्र शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) डॉ. सविता बिरगे यांनी काढले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)