विशाल पाटील यांना सातपुडा गौरव पुरस्काराने सन्मानित

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेच वृत्तसेवा ) :

ट्रायबल स्पोर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, नंदुरबार महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने जि.प.शाळा अजेपूर येथील उपक्रमशील, आदर्श प्राथमिक शिक्षक विशाल दिलीप पाटील यांना मानाचा राष्ट्रीय व जिल्हा स्तरीय असलेला "सातपुडा गौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रीडा उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.नाशिक विभागाचे सुनंदा पाटील होते. तर प्रमुख उपस्थितीत क्रीडा संचालक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीचे प्रा.डॉ.विक्रमसिंग व सचिव पेफी महाराष्ट्र राज्याचे बलवंत सिंग उपस्थित होते. 


या कार्यक्रमात चेअरमन हस्ती ग्रुप दोंडाईचाचे कैलास जैन, उपनगराध्यक्ष नगरपालिका नंदुरबार कुणाल वसावे, सचिव, मुख्याध्यापक संघ नंदुरबारचे पुष्पेंद्र जैन, सभापती, पाणीपुरवठा नगरपालिका नंदुरबार कैलास पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष डॉ.मयूर ठाकरे, उपाध्यक्ष जितेंद्र माळी, सचिव जगदीश वंजारी व संस्थेचे सदस्य होते. या संस्थेच्या वतीने राज्यभरातील  शालेय क्रीडा विभागात उल्लेखनीय, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, शालेय पातळीवर राबवलेले उल्लेखनिय उपक्रम, लॉकडाऊन काळात राबवलेले उल्लेखनिय उपक्रम, कोरोना जनजागृती व कोरोना योद्धा म्हणून केलेले कार्य, आरोग्य शिक्षण असे विविध उपक्रमांनी ज्ञानदान करणारे गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.


 विशाल पाटील या  अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या गुरुजींना नंदुरबार जिल्हा परिषदेने सेवेच्या १० वर्षांच्या कालावधीत सन २०१९-२०२० या वर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करून कामाची पोच पावती व शिक्षकांना आदर्श शिक्षकांचे मूर्तिमंत उदाहरण करून दिले होते. आणि आज हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतील गाव, ग्रामस्थ, विद्यार्थी, विविध अधिकारी, पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ त्यांचे शिक्षक मित्र परिवार यांनी कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)