निसर्ग माझा सोबती ; विद्यार्थांचा परिसंवाद !

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वांवरच आहे. मुंबईतील आरे कार शेडवरून राज्यातील पर्यावरणाचा प्रश्न राजकीय बनला आहे. प्रश्न राजकीय असला तरी आज गरज आहे सामाजिक प्रश्नाची याचे भान ठेवून मुंबईतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत निसर्ग माझा सोबती या विषयावर एका विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते. 


शाळेच्या इंग्रजी विषय प्रमुख श्रीमती दीपिका जैन या शिक्षकेनी या परिसंवादाचे उत्कृष्ट आयोजन केले होते. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत निसर्ग माझा सोबती या विषयावर आपले विचार प्रकट केले. या स्पर्धेसाठी गांधी शिक्षण भवन या शिक्षक घडवण्याचे कार्य करणाऱ्या अध्यापक महाविद्यालयातील वरीष्ठ प्राध्यापिका श्रीमती साबिया मोरे मँडम परीक्षक म्हणून उपस्थीत होत्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)